Delhi Traffic Police | दिल्ली ट्रॅफिक पोलीस (Delhi Traffic Police) लोकांमध्ये रहदारीच्या नियमांबद्दल जागरूकता आणण्यासाठी वेगवेगळ्या पद्धती अवलंबत आहेत. यासाठी पोलिसांकडून मोठ्या प्रमाणात सोशल मीडियाचाही वापर करण्यात येत असतो. दिल्ली ट्रॅफिक पोलीस नेहमीच ट्विटरवर (Twitter) सक्रिय असतात. दिल्ली ट्रॅफिक पोलिसांच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून नुकतेच एक ट्विट करण्यात आले असून त्यामध्ये एकूण 5 गोष्टींचा उल्लेख आहे.
परंतु ट्रॅफिक पोलिसांचे म्हणणे आहे, की शेवटच्या 3 गोष्टी अत्यंत महत्वाच्या (3 useful things) आहेत. त्यामुळे त्या गोष्टी प्रत्येक व्यक्तीने नेहमी लक्षात ठेवल्या पाहिजेत. त्यांचे अवलंबन न केल्यास काय होईल याचीही माहिती शेअर करण्यात आली आहे.
दिल्ली ट्रॅफिक पोलिसांच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून अलीकडेच एक ट्विट करण्यात आले आहे. ‘या वर्षी 5 गोष्टी तुम्ही चुकवू नये. विशेषतः शेवटच्या 3’, या कॅप्शनसह 19 सेकंदांचा व्हिडिओ पोलिसांनी शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये 5 गोष्टी सांगण्यात आल्या आहेत, पहिली गोष्ट म्हणजे T20 क्रिकेट वर्ल्ड कप, दुसरी गोष्ट म्हणजे FIFA वर्ल्ड कप. यानंतर अशा 3 गोष्टी ज्यावर तुम्हाला विशेष लक्ष द्यावे लागेल, असे म्हटले आहे.
5 THINGS YOU REALLY MUST NOT MISS THIS YEAR!.. specially the last 3 ones! pic.twitter.com/z846OTrfcW
— Delhi Traffic Police (@dtptraffic) September 7, 2022
तिसरी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हेल्मेट, चौथी महत्त्वाची गोष्ट म्हणजे वाहनाचा विमा आणि पाचवी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही किंवा तुमच्यासोबत इतर कोणीही गाडीत प्रवास करत असेल तर त्यांनी नेहमी सीट बेल्ट लावण्याची विशेष काळजी घ्यावी. दिल्ली ट्रॅफिक पोलिसांचे म्हणणे आहे की, पुढच्या आणि मागच्या बाजूला बसलेल्या लोकांनीही सीट बेल्ट लावणे अत्यंत आवश्यक आहे.