जुगाड तर बघा! खाटेपासून बनवली गाडी, पण आनंद महिंद्रा म्हणतात…

| Updated on: Jun 12, 2023 | 3:45 PM

हे पाहून लोक या व्यक्तीला 'सर्वात मोठा जुगाडू' म्हणत आहेत. पण देसी जुगाडचा व्हिडिओ पाहून देशातील दिग्गज उद्योगपती आनंद महिंद्रा तितकेसे प्रभावित झाले नाहीत. महिंद्रा अँड महिंद्रा ग्रुपचे चेअरमन असं का म्हणाले?

जुगाड तर बघा! खाटेपासून बनवली गाडी, पण आनंद महिंद्रा म्हणतात...
Cot Vehicle
Image Credit source: Social Media
Follow us on

मुंबई: सध्या सोशल मीडियावर मोटारने चालत असलेल्या चारचाकी गाडीचा व्हिडिओ चांगलाच चर्चेत आला आहे. हे पाहून लोक या व्यक्तीला ‘सर्वात मोठा जुगाडू’ म्हणत आहेत. पण देसी जुगाडचा व्हिडिओ पाहून देशातील दिग्गज उद्योगपती आनंद महिंद्रा तितकेसे प्रभावित झाले नाहीत. महिंद्रा अँड महिंद्रा ग्रुपचे चेअरमन असं का म्हणाले? त्याआधी पाहूया हा व्हिडिओ.

व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक तरुण आपली चारचाकी गाडी घेऊन पेट्रोल पंपावर पोहोचतो, ज्यामुळे पंप कर्मचारीही हैराण होतात. ज्यांनी हा व्हिडिओ शेअर केला आहे ते याला एक आश्चर्यकारक इनोव्हेशन म्हणत आहेत. आपत्कालीन परिस्थितीत हा जुगाड गावातील लोकांसाठी वरदान ठरू शकतो, असा त्यांचा विश्वास आहे. मात्र त्याचा उद्योगपती महिंद्रांवर तितकासा प्रभाव पडला नाही. पाहा हा व्हिडिओ.

Desi Jugaad vehicle

उद्योगपती महिंद्र यांनी हा व्हिडिओ ट्विट करत लिहिलं आहे की, हा एक प्रॅंक जुगाड सारखा दिसत आहे. याशिवाय यामुळे नियमांचेही उल्लंघन होते. मात्र, दुर्गम भागातील अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत हे जीवदान ठरू शकते, असेही त्यांनी म्हटले आहे.

एका युजरने लिहिले की, “चांगली गोष्ट म्हणजे श्रीमंत आणि गरीब दोघेही तंत्रज्ञानाचा वापर करून समस्या सोडवण्याचा विचार करत आहेत. हे स्वागतार्ह आहे. तर आणखी एका युजरने लिहिलं आहे की, सुरक्षाही महत्त्वाची आहे. आणखी एका युजरने कमेंट केली की, “हा माणूस जुगाडचा बाप ठरला.”