मुंबई: भारतात जुगाड खूप चालतो. जुगाड करताना खर्च कमी, डोकं जास्त आणि पटकन आपलं काम होईल असं बघितलं जातं. जुगाड करणं दिसतं तितकं सोपं तर कधीच नसतं. त्यासाठी एखाद्याला डोकं हवं. असे अनेक जुगाडू व्हिडीओ व्हायरल होत असतात. हे व्हिडीओ मोठमोठ्या लोकांकडून रिपोस्ट केले जातात. व्हिडीओ बघताना आपल्यालाच धक्का बसतो, आपल्यालाही प्रश्न पडतो “अरे हे असं कसं?” पण लोकं कमी खर्चात तो जुगाड बसवतात. याआधी देखील आपण असे अनेक व्हिडीओ पाहिलेत, यात कधी आपण जुगाड करून पंखा बनवलेला पाहिलाय तर कधी आपण मोटार बनवलेली पाहिली. हे जुगाड तंत्रज्ञान उलट लोकांच्या मदतीलाच येते. असाच एक व्हिडीओ व्हायरल होतोय. यात एका माणसाने एक विचित्र मोनोसायकल बनवलीये.
व्हिडीओ मध्ये तुम्ही बघू शकता की एक माणूस रस्त्याने एका गाडीवर चाललाय. ही गाडी बघण्यासारखी आहे. केशरी रंगाची ही गाडी रस्त्यावर सगळ्यांचं लक्ष वेधून घेतीये. बघताना असं वाटतं की हा माणूस एखाद्या खेळण्यात बसलाय. व्हिडीओ मध्ये “मुसाफिर हू यारो” हे गाणं लावलंय. ते गाणं खरंच त्या व्हिडिओला सूट होतंय. हा देसी जुगाड बघून भलेभले चक्रावलेत. सोशल मीडियावर या व्हिडिओला 8.3 मिलियन व्यूज आणि 367,000 लाइक्स मिळालेत. ही मोनोसायकल बघून वाटतं, जुगाड करताना लोक काहीही करू शकतात.
एका मोठ्या चाकापासून ही गाडी बनवलीये. तुम्हालाही ही गाडी अचानक रस्त्यावर दिसली तर तुम्ही सुद्धा चक्रावून जाल. @iamsuratcity नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटने हा व्हिडीओ शेअर केलाय. ही मोनोसायकल बनवताना या व्यक्तीने त्याच्या घराच्या आजूबाजूच्या वस्तूंचा वापर केलाय. खूप शक्कल लावून त्याने ही मोनोसायकल बनवलीये. विशेष म्हणजे काय हा व्हिडीओ गुजरातमधील सुरतचा आहे. या गाडीचं सगळीकडून भरभरून कौतुक केलं जातंय.