सोशल मीडिया हे असं व्यासपीठ आहे जिथं कुणी काहीही पोस्ट करतं आणि ते व्हायरल होते. मनोरंजनाचं सोशल मीडिया हे नवं माध्यम झालं आहे, त्यामुळेच नवनवीन व्हिडीओ पाहून लोक आनंदित होतात. सध्या व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये एक माकड दिसत आहे, जे काही साधूंसोबत किर्तनात बसलं आणि भक्तीत मग्न आहे. हा व्हिडीओ लोकांना खूप आवडत आहे. ( Devotees were singing kirtan when the monkey started playing the video is going viral)
व्हिडिओमध्ये पाहु शकता की,अनेक लोक कीर्तन करताना दिसत आहेत. त्याचबरोबर त्या व्हिडिओमध्ये माकडही दिसत आहे. व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये, माकड भक्तीच्या आनंदात बुडालेलं आहे. त्याच्या दोन्ही हातांनी कर्ताल वाजवत आहे. नेटकरी हे माकड पाहून आश्चर्यचकित झाले आहेत.
या व्हिडिओमध्ये एक माकड सहजपणे कर्ताल वाजवत आहे. त्याची कर्ताल वाजवण्याची ही शैली सगळ्यांनाच खूप आवडते. व्हायरल होणाऱ्या या व्हिडिओमध्ये लोक वेगवेगळ्या प्रकारच्या प्रतिक्रिया देत आहेत. व्हिडिओमध्ये हे स्पष्टपणे पाहिले जाऊ शकते की, एक माकड किर्तन करणाऱ्या लोकांमध्ये उपस्थित आहेत. काही लोक म्हणत आहेत की हे माकड हनुमानचं रुप आहे.
पाहा व्हिडीओ:
हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म फेसबुकवरुन शेअर करण्यात आला आहे. पंकज पराशर यांच्या नावाच्या फेसबुक पेजवर व्हिडिओ पाहू शकता. आतापर्यंत 3.5 लाखांहून अधिक लोकांनी हा व्हिडिओ पाहिला आहे. तसेच, 22 हजार लोकांनी हा व्हिडिओ शेअर केला आहे. कमेंट करताना एकाने लिहिले आहे – इतके निष्ठावान माकड कधीही पाहिले नाही. त्याचवेळी दुसऱ्याने लिहिले – हे पाहणे खरोखर आनंददायी आहे, तिसऱ्याने या माकडाला हनुमानाचं रूप असल्याचे सांगितले.
हेही वाचा: