MS Dhoni चा विमानातला व्हिडीओ व्हायरल! एअर होस्टेसचा fangirl moment…

| Updated on: Jul 30, 2023 | 12:49 PM

आवडती व्यक्ती अचानक दिसली तर? काय कराल? स्वतःहून बोलायला जाल की फोटो काढाल की जाऊन आधी मिठी माराल? नेमकं काय कराल? खरं तर अशावेळी आपल्याला काहीच सुचत नाही. आपण गोंधळून जातो आणि काहीही वेड्यासारखं करू लागतो. कधीकधी आपण समोरच्या व्यक्तीचे इतके मोठे फॅन असतो कि ती व्यक्ती लांबून बघायला मिळाली तरी आपल्यासाठी खूप असतं.

MS Dhoni चा विमानातला व्हिडीओ व्हायरल! एअर होस्टेसचा fangirl moment...
MS Dhoni viral video
Follow us on

मुंबई: समजा तुम्हाला तुमची एखादी आवडती व्यक्ती अचानक दिसली तर? काय कराल? स्वतःहून बोलायला जाल की फोटो काढाल की जाऊन आधी मिठी माराल? नेमकं काय कराल? खरं तर अशावेळी आपल्याला काहीच सुचत नाही. आपण गोंधळून जातो आणि काहीही वेड्यासारखं करू लागतो. कधीकधी आपण समोरच्या व्यक्तीचे इतके मोठे फॅन असतो कि ती व्यक्ती लांबून बघायला मिळाली तरी आपल्यासाठी खूप असतं. आता विचार करा ती व्यक्ती जर “धोनी” असेल तर? शॉक लागेल ना? असंच काहीसं या एअर होस्टेस सोबत घडलं.

या एअर होस्टेसचा हा फॅनगर्ल मुव्हमेंट चांगलाच व्हायरल झालाय! ज्या विमानात तिची ड्युटी लागली होती तिथे एम.एस.धोनी होता. ही एअर होस्टेस धोनीची प्रचंड मोठी फॅन! धोनी झोपलेला असताना तिने एक व्हिडीओ काढला. एका बाजूला धोनी त्याच्या सीटवर निवांत झोपलेला आहे आणि दुसऱ्या बाजूला ही एअर होस्टेस. या व्हिडीओवर नेटकरी दोन्ही बाजूने बोलतायत. काही जण म्हणतायत,”हे सगळं खूप क्युट आहे” तर काही जण म्हणतायत, “झोपलेल्या व्यक्तीचा असा व्हिडीओ काढणं चुकीचं आहे.” त्याचबरोबर चाहत्यांनी एअर होस्टेसवर क्रिकेटपटूच्या प्रायव्हसीचा भंग केल्याबद्दल टीका केलीये.

नुकताच धोनी त्याच्या प्रॉडक्शनच्या पहिल्या चित्रपट ‘एलजीएम’च्या ट्रेलर लाँचला त्याची पत्नी साक्षीसोबत चेन्नईत उपस्थित होता. धोनीने मनोरंजन क्षेत्रासह अनेक व्यवसायात गुंतवणूक केली असून त्याने धोनी एंटरटेनमेंट प्रायव्हेट लिमिटेड नावाचे स्वतःचे प्रॉडक्शन हाऊस सुरू केले आहे. ‘एलजीएम’ हा त्यांचा पहिला चित्रपट असेल.