तासंतास मेहनत घेतल्यानंतर मिळालेल्या त्या ‘एम्प्लॉयी ऑफ द इयर’ कॉफी मगमध्ये तुम्हाला खूप समाधान वाटत असेल, तर या अब्जाधीश बॉसचा आपल्या कर्मचाऱ्यांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा मार्ग बघा. हे वाचलं तर तुम्हाला थोडासा हेवा वाटू शकतो. सिटाडेलचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि संस्थापक केन ग्रिफिन यांनी आपल्या कंपनीत काम करणाऱ्या 10,000 कर्मचाऱ्यांसाठी आणि त्यांच्या कुटुंबियांसाठी डिजनीलँड सहल आयोजित केली. या बॉस ने चक्क आपल्या कर्मचाऱ्यांसाठी फ्लोरिडाच्या डिजनी लँड साठी तीन दिवसांच्या सहलीसाठी पैसे दिलेत. हा बॉस या वर्षीचा ‘कूलेस्ट बॉस’ आहे असं म्हणायला हरकत नाही.
केन ग्रिफिनने न्यूयॉर्क, ह्यूस्टन, पॅरिस, झुरिच आणि इतर शहरांमध्ये काम करत असलेल्या सर्व कर्मचाऱ्यांच्या विमानाच्या तिकिटांची काळजी घेतली.
त्यांच्या जेवणाचा आणि इतर सुविधांचा खर्चही त्यांनी बघितला. ग्रिफिनने डिस्नेलँडमधील कर्मचाऱ्यांसाठी कोल्डप्ले आणि कार्ली राय जेप्सेनच्या कॉन्सर्टची व्यवस्था केलीये.
न्यूयॉर्क पोस्टने दिलेल्या वृत्तानुसार ग्रिफिनने आपल्या स्टाफला सांगितले की, “आपण आपल्या इतिहासातील सर्वात चांगली टीम तयार केलीये. आपल्यापुढे एक चांगलं भविष्य आहे, पुढे मिळणाऱ्या यशांसाठी देखील मी उत्सुक आहे.”
केन ग्रिफिन हे फोर्ब्सच्या यादीनुसार जगातील 40 वे सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत.