भारतात शेकडो छोट्या-मोठ्या नद्या आहेत, ज्या लोकांच्या उपजीविकेचे साधन आहेत. पण, तुम्हाला माहिती आहे का की भारतात एक नदी आहे ज्या नदीतून सोनं बाहेर येतं. नदीच्या आसपास राहणारे लोक सोने काढून विकतात आणि पैसे कमवतात. मात्र नदीमध्ये सोनं कुठून येते, याबाबत कोणतीही माहिती उपलब्ध नाही आणि अनेक शास्त्रज्ञांनी संशोधनही केले आहे, पण सोने कोठून येते, हे मात्र अद्याप गूढच आहे.
ही सोन्याची नदी झारखंड राज्यात वाहते आणि तिचे नाव स्वर्णरेखा नदी असे आहे. सोन्याच्या उपलब्धतेमुळे या नदीला स्वर्णरेखा नदी असे नाव असून ती झारखंडशिवाय पश्चिम बंगाल आणि ओडिशा येथेही वाहते. ही नदी झारखंडची राजधानी रांचीपासून १६ किमी अंतरावर उगम पावते आणि थेट बंगालच्या उपसागरात येते.
झारखंडमध्ये स्वर्णरेखा नदी ज्या भागातून जाते त्या भागात लोक पहाटेच जातात आणि वाळू गाळून सोनं गोळा करतात.
लोक अनेक पिढ्यांपासून सोनं काढून पैसे कमवत आहेत. एवढेच नव्हे तर नदीतून सोने बाहेर काढण्यात स्त्री-पुरुषांशिवाय लहान मुलेही गुंतली आहेत.
सुवर्णरेखा नदीतील सोने कोठून येते, इथपर्यंत ते एक गूढच राहिले आहे. तथापि, काही भूगर्भशास्त्रज्ञांचे म्हणणे आहे की स्वर्णरेखा नदी खडकांमधून येते आणि म्हणूनच त्यात सोन्याचे कण असू शकतात. मात्र, सोने कुठून येते, याबाबत अद्यापपर्यंत ठोस माहिती मिळालेली नाही.
सुवर्णरेखा नदीची एक उपनदीही आहे, जिच्यातून लो सोना काढला जातो. सुवर्णरेखाची उपनदी असलेल्या ‘करकरी’च्या वाळूतही सोन्याचे कण दिसतात आणि इथेही लोकांना सोने मिळते. सुवर्णरेखा नदीतील सोने प्रत्यक्षात करकरी नदीतून येते, असा अंदाज आहे.