मुकेश अंबानी हे जगातील नववे श्रीमंत व्यक्ती आहेत. त्याचबरोबर ते भारतातील दुसऱ्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती आहेत. भारतात बरोबरच आपला व्यवसायही त्यांनी जगात पसरवला आहे. मुकेश अंबानी हे भारतातच नव्हे, तर जगभरातले लोक त्यांना ओळखतात. जगातील सर्वात यशस्वी उद्योगपतींपैकी एक असलेले मुकेश अंबानी हे त्यांच्या आलिशान जीवनशैलीसाठीही ओळखले जातात. मुकेश अंबानींच्या घरी स्वयंपाक करणाऱ्या शेफचा पगार किती असेल, असा प्रश्न तुम्हाला कधी पडला आहे का?
अँटिलियामध्ये काम करणाऱ्या शेफला दोन लाख रुपयांपेक्षा जास्त पगार दिला जातो. काही शेफचा पगार तर त्याहूनही जास्त आहे.
आता तुम्ही असा विचार करत असाल की शेफचा पगार जर लाखोंच्या घरात असेल तर ते खूप आलिशान किंवा अनोखे पदार्थ बनवत असतील.
पण याचं उत्तर नाही असं आहे, कारण मुकेश अंबानींना साधं गुजराती जेवण आवडतं आणि त्यांना फार युनिक फूडची आवड नाही. यामुळे शेफचं काम फक्त साधं जेवण बनवणं एवढंच असतं.
अँटिलियामध्ये काम करणाऱ्या एका कर्मचाऱ्याचा पगार सरासरी दोन लाख रुपये आहे.
देशातील सर्वात मोठ्या रुग्णालयांपैकी एक असलेल्या दिल्लीतील एम्समधील एका डॉक्टरचे सरासरी वेतन सुमारे एक लाख रुपये आहे.
अंबानींच्या घरी काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा पगार एम्सच्या डॉक्टरांपेक्षा जास्त आहे. त्याचबरोबर अँटिलियाबद्दल बोलायचं झालं तर ५७० फूट उंच आणि ४,००,० चौरस फुटांवर पसरलेली ही भव्य इमारत आहे.
यात तीन हेलिपॅड, १६८ गाड्यांचे गॅरेज, बॉलरूम, ५० आसनी थिएटर, टेरेस गार्डन, स्पा आणि मंदिर आहे.