डॉक्टरांना करोडोमध्ये पगार आणि 4BHK राहायला, इतकी स्पेशल ट्रीटमेंट का?

| Updated on: Feb 16, 2023 | 1:05 PM

एक छोटंसं, ग्रामीण, लोकसंख्या कमी असलेलं शहर असल्यामुळे इथे डॉक्टर्स येऊन राहत नाहीत. बोनस, चांगला पगार आणि चांगल्या सोयीसुविधा दिल्यानं ही समस्या दूर होऊ शकते.

डॉक्टरांना करोडोमध्ये पगार आणि 4BHK राहायला, इतकी स्पेशल ट्रीटमेंट का?
Doctors salary
Image Credit source: Social Media
Follow us on

ऑस्ट्रेलियातील एका शहरात डॉक्टरांना वर्षाला आठ लाख डॉलर (6,56,00,490 रुपये) पगार आणि चार बेडरूमचे घर मोफत दिले जात आहे, पण हे सर्व निराशेपोटी दिले जात आहे. क्वायराडिंग (Quairading) नावाचे हे शहर पश्चिम ऑस्ट्रेलियाच्या व्हीटबेल्ट भागात वसलेले आहे. हे पर्थच्या पूर्वेला सुमारे दोन तासांच्या अंतरावर आहे. कायमस्वरूपी निवासी डॉक्टर मिळण्यासाठी शहरात अनेक महिन्यांपासून धडपड सुरू आहे. डेलीमेल यूकेने दिलेल्या वृत्तानुसार, क्वाराडिंगमध्ये काम करू इच्छिणाऱ्या डॉक्टरांना 6.56 कोटी रुपये देण्याचा निर्णय नगर परिषदेने घेतला आहे.

डॉक्टरांना उत्तम पगारासह बोनस आणि प्रोत्साहन देखील उपलब्ध आहे. जर डॉक्टरने दोन वर्षांहून अधिक काळ शहरात राहण्याचा निर्णय घेतला तर त्याला 12,000 डॉलर (9.94 लाख रुपये) आणि पाच वर्षांहून अधिक काळ शहरात काम केल्यास 23,000 डॉलर (19.05 लाख रुपये) अतिरिक्त बोनस मिळेल.

या छोट्या शहरात केवळ 619 रहिवासी आहेत आणि हे शहर निवासी डॉक्टर शोधण्यासाठी झगडत आहे. एक छोटंसं, ग्रामीण, लोकसंख्या कमी असलेलं शहर असल्यामुळे इथे डॉक्टर्स येऊन राहत नाहीत. बोनस, चांगला पगार आणि चांगल्या सोयीसुविधा दिल्यानं ही समस्या दूर होऊ शकते असं इथल्या प्रशासनाचं म्हणणं आहे.

ऑस्ट्रेलियात देशभरातील छोट्या शहरांमध्ये जनरल प्रॅक्टिशनर्सची कमतरता भासत आहे. त्यामुळे काही शहरांना वैद्यकीय केंद्रांचे दरवाजे बंद करावे लागले आहेत.

शायर ऑफ क्वायराडिंगचे प्रेसिडेंट पीटर स्मिथने सांगितले की परिषद पुढील आठवड्यात वेस्टर्न ऑस्ट्रेलियन वैद्यकीय प्रकाशनांमध्ये आकर्षक नोकरीच्या ऑफर पोस्ट करेल. जर ते डॉक्टरांना आकर्षित करण्यात अपयशी ठरले तर ईस्ट कोस्टवरील प्रकाशकांमध्ये ही जाहिरात दिली जाईल.

राष्ट्रीय आकडेवारीनुसार केवळ 14 टक्के ऑस्ट्रेलियन वैद्यकीय विद्यार्थ्यांना जनरल प्रॅक्टिशनर म्हणून करिअर करायचे होते आणि केवळ 4.5 टक्के लोक क्वॉरिंगसारख्या छोट्या शहरात काम करण्यास तयार आहेत.