मुंबई : अहमदाबादमधील (Ahmedabad) अपोलो रुग्णालयातील डॉक्टरांनी एका महिलेच्या पोटातून 47 किलोची गाठ (47 Kg Tumor) काढून तिला एक प्रकारे नवजीवनच दिले आहे. या गाठीचे वजन महिलेच्या वजनाच्या जवळपास दुप्पट होते. शस्त्रक्रियेनंतर महिलेचे वजन केवळ 49 किलो इतके झाले. जेव्हा त्या महिलेला ऑपरेशन (Operation) थिएटरमधून बाहेर काढण्यात आले, तेव्हा तिला वाटले की तिच्या शरीरावरचे मोठे ओझे काढून टाकले गेले आहे.
महिलेच्या पोटातून 47 किलोची गाठ काढण्यात यश
अपोलो हॉस्पिटल्सचे सर्जिकल गॅस्ट्रोएन्टेरोलॉजिस्ट डॉ. चिराग देसाई म्हणाले की, “शस्त्रक्रियेपूर्वी रुग्णाचे वजन करणे कठीण होते, कारण ती नीट उभीही राहू शकत नव्हती. मात्र ऑपरेशननंतर महिलेचे वजन 49 किलो इतके कमी झाले. डॉक्टर देसाई यांच्या म्हणण्यानुसार, गाठीसह काढलेल्या भागाचे वजन महिलेच्या वजनापेक्षा खूप जास्त होते. टाईम्स ऑफ इंडियाच्या रिपोर्टनुसार, या महिलेच्या मोठ्या मुलाने सांगितले की, त्याची आई 18 वर्षांपासून या गाठीसोबत राहत होती. सुरवातीला ही गाठ इतकी मोठी नव्हती. पण नंतर तिचा आकार झपाट्याने वाढू लागला.
इथे पाहा महिलेच्या गाठीचा फोटो!
कोरोनामुळे दोन वर्षे या महिलेला दवाखाण्यात घेऊन जाणे शक्य नसल्याचे महिलेच्या मुलाने सांगितले. या काळातच ही गाठ दुप्पट मोठी झाली. त्यामुळे महिलेला सतत वेदना होत होत्या. तिला अंथरुणातून उठताही येत नव्हते. यानंतर कुटुंबीय अपोलो रुग्णालयात गेले, तेथे डॉक्टरांनी 27 जानेवारीला तपासणीनंतर शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला आणि या महिलेची यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली.
संबंधित बातम्या :
VIDEO : हम भी किसी से कम नहीं… म्हणत पुण्यातील महिलांचा मराठी तडका! श्रीवल्लीवर थिरकल्या…