VIDEO : जेव्हा इमानदार जोडीदार गाडी पार्कसाठी सूचना देतो, व्हिडीओ बघितल्यावर तुम्ही कुत्र्याचे फॅन व्हाल !

| Updated on: May 20, 2021 | 9:18 PM

सोशल मीडियावर नेहमी वेगवेगळे आणि अनोखे व्हिडीओ व्हायरल होत असतात (Viral Video of Dog)

VIDEO : जेव्हा इमानदार जोडीदार गाडी पार्कसाठी सूचना देतो, व्हिडीओ बघितल्यावर तुम्ही कुत्र्याचे फॅन व्हाल !
Follow us on

मुंबई : सोशल मीडियावर नेहमी वेगवेगळे आणि अनोखे असे व्हिडीओ व्हायरल होत असतात. असाच काहिसा व्हिडीओ आतादेखील व्हायरल होताना दिसत आहे. या व्हिडीओत एक कुत्रा कार ड्रायव्हरला पार्किंगसाठी मदत करताना दिसत आहे. हा व्हिडीओ बघितल्यावर तुम्ही कुत्र्याचे खरंच फॅन व्हाल. कारण तो अगदी माणसासारखं हुबेहूब कार ड्रायव्हरला गाडी पार्क करण्यासाठी मार्गदर्शन करत आहे. याबाबतचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय (Viral Video of Dog).

व्हिडीओत नेमकं काय?

संबंधित व्हिडीओ हा Humor And Animals या ट्विटर अकाउंटवरुन शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडीओ 19 मे रोजी ट्विटरवर शेअर करण्यात आला होता. त्यानंतर हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाला. या व्हिडीओत कुत्रा ड्रायव्हरल गाडी पार्क करण्यासाठी लगातार इशारा करताना दिसत आहे. त्यानंतर गाडी फुटपाथ जवळ आल्यानंतर तो गाडी थांबवण्याचे संकेत देतो (Viral Video of Dog).

व्हिडीओवर अनेकांच्या प्रतिक्रिया

कोणत्याही ड्रायव्हरसाठी गाडी पार्क करणं हे आव्हानचं असतं. अशावेळी एका कुत्र्याने त्याला पार्किंगसाठी मदत करणं हे खरंच कौतुकास्पद आहे, अशा प्रतिक्रिया अनेकजण देत आहेत. हा व्हिडीओ अनेकजण शेअर करत आहेत.

व्हिडीओ बघा :

हेही वाचा :

पुढच्या आठवड्यात दिसणार वर्षातील शेवटचा ‘सुपर फ्लॉवर मून’, जाणून घ्या भारतात कसे दिसेल चंद्रग्रहण

VIDEO : चिमुकलीचे अपहरणकर्त्याशी दोन हात, नराधमाला जमिनीवर पाडलं, घटना कॅमेऱ्यात कैद, व्हिडीओ व्हायरल