प्रत्येक माणूस इतका घाईत असतो की रस्त्यावर गाडी, दुचाकी चालवताना सुद्धा तो खूप घाईत असतो. गाडी थांबविण्याचे तो नाव घेत नाही. अशा लोकांपुढे एकच लक्ष्य असतं त्यांना घरातून बाहेर पडलं की ऑफिस गाठायचं असतं. वाटेत कुणी रस्ता ओलांडताना दिसलं तर लोकही त्यांच्यावर रागावतात. आपल्या सभोवतालच्या लोकांचे असे वर्तन तुम्ही पाहिले असेलच. मात्र पाश्चिमात्य देशांमध्ये ही पद्धत जरा बरी आहे. तिथे सगळं काम शिस्तबद्ध पद्धतीनं चालतं. अहो कुत्री सुद्धा फार शिस्तबद्ध आहेत तिथली. सध्या कुत्र्याने (Dogs) मुलांना रस्ता ओलांडायला लावल्याचा व्हिडिओ व्हायरल (Dog Video Viral) होत आहे. यात तो छोटुसा कुत्रा लहान मुलांसाठी गाड्या थांबवतो आणि मुलं अगदी आरामात रस्ता ओलांडतात (Road Crossing).
हा व्हिडिओ अवनीश शरणने आपल्या ट्विटरवर शेअर केला आहे. हा व्हिडिओ जॉर्जियातील बाटुमी येथील असल्याचं म्हटलं जात आहे. जिथे बालवाडी शाळेतील मुलांचा एक गट आपल्या शिक्षकासोबत रस्त्यावर फिरताना दिसतो. मुले पादचारी मार्गावर येताच कुत्रा दुसऱ्या बाजूला जाऊन मुलांसाठी गाड्या अडवतो आणि त्यांच्यावर भुंकू लागतो. तो कुत्रा रस्ता ओलांडताना त्यांच्यासोबतही जातो. हे काम तो आपले कर्तव्य म्हणून करत असल्याचे दिसते. हा व्हिडिओ इतका व्हायरल झाला की या कुत्र्याला तिथे पुरस्कारही देण्यात आला.
This Will Make Your Day.❤️ pic.twitter.com/5MFETG4OA9
— Awanish Sharan (@AwanishSharan) July 30, 2022
लोकांनी हा व्हिडिओ पाहिला तेव्हा त्यांनीही कुत्र्याच्या या कामाचं कौतुक केलं. त्याला हा व्हिडिओ खूप आवडला. एका युझरने कमेंट केली की, आज माणसांपेक्षा प्राण्यांमध्ये जास्त सामान्य ज्ञान आहे. काही लोकांनी तर गंमतही केली की, एका युझरने लिहिले की, असे वाटते की, मागील आयुष्यात ट्रॅफिक हवालदार होता. अनेक लोकांनी अनेक कमेंट्स केल्या पण हा व्हिडीओ मात्र सगळ्यांना तितकाच भावलाय.