मुंबई : सध्या सोशल मीडियावर विविध व्हीडिओ व्हायरल (Viral Video) होत असतात. यात प्राण्यांच्या व्हीडिओंना जासत पसंती मिळताना दिसते. आपल्या घरात एखादा साप निघाला तर आपली घाबरगुंडी उडते पण सध्या एक व्हीडिओ व्हायरल होत आहे. यात डझनभर साप (snakes Video) एका झाडाला लटकलेले दिसत आहेत. या व्हीडिओमध्ये अनेक साप एका छोट्या झाडावर चढण्यासाठी एकमेकांशी भांडताना दिसत आहेत. हा व्हीडीओ पाहून अंगावर अक्षरश: शहारे येतात.
सध्या एक व्हीडिओ व्हायरल होत आहे. यात डझनभर साप एका झाडाला लटकलेले दिसत आहेत. या व्हीडिओमध्ये अनेक साप एका छोट्या झाडावर चढण्यासाठी एकमेकांशी भांडताना दिसत आहेत. हा व्हीडीओ पाहून अंगावर अक्षरश: शहारे येतात. व्हीडिओमध्ये ज्या प्रकारे अनेक एवढे साप एकत्र पाहायला मिशत आहेत, असं चित्र सहसा एकत्र पाहायला मिळत नाही. इन्स्टाग्रामवर snake._.world या अकाऊंटवरून व्हीडिओ शेअर करण्यात आला आहे.
एका मोकळ्या मैदानात एक छोटं झाड दिसतंय. या झाडाची फांदी पकडण्यासाठी अनेक साप लढताना दिसत आहेत. हे सर्व साप एकमेकांना चिकटून बसलेले दिसत आहेत. ते एकमेकांशी खुन्नशीने भांडतानाही दिसत आहेत. हे थक्क करणारं दृश्य अनेकांना धक्का देणारं आहे. या व्हीडिओला हजारो लोकांनी पाहिलंय. तर दोन हजारांहून अधिकांनी लाईक केलंय.
सध्या सोशल मीडियावर आणखी एका व्हीडिओनं धुमाकुळ घातलाय. व्हायरल झालेल्या व्हीडिओमध्ये हजारो विंचू जमिनीवर, भिंतीवर आणि घराच्या छतावर दिसत आहेत. हा व्हीडीओ कुठला आहे याबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही. मात्र व्हीडिओ पाहून अनेकांना धक्का बसलाय.