सोशल मीडियावर असे अनेक व्हिडीओज दिसतात ज्यात लोक आनंद घेण्यासाठी कोणत्याही थराला जातात, लोकांना भान राहत नाही. पण आनंद कधीकधी बॅकफायर होतो, जीवावर बेततो. असाच एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये एक मुलगी नशेत होती आणि तिने पबच्या बाल्कनीतून उडी मारली. सुदैवाने तिचा जीव वाचलाय पण या घटनेचा व्हिडीओ मात्र व्हायरल झालाय.
खरंतर हा व्हिडिओ अनेक सोशल मीडिया युझर्सनी शेअर केला आहे. ट्विटरवर व्हिडीओ शेअर करत असताना एका युझरने “ओह माय गॉड” असं लिहिलं आणि नंतर शेअर केला.
हा व्हिडिओ कुठून आला आणि कधीचा आहे, याची माहिती मिळालेली नाही, मात्र हे भयंकर आणि खूप भीतीदायक दृश्य आहे. कारण या मुलीने स्वत:च आपल्या जीवाची पर्वा केलेली नाही.
व्हिडिओत दिसतंय की मुलगी बाल्कनीत उभी आहे. ती दारूच्या नशेत असल्याचे स्पष्ट दिसत आहे. खाली रस्त्यावर बरेच लोक तिला चिअर करत आहेत आणि ती उडी मारण्याच्या विचारात आहे.
ती बघते बघते आणि अचानक खाली उडी मारते. पाठीवर उडी टाकल्यावर ती खाली जोरात पडते. तिला कुणीही पकडलं नाही. तिने स्वत:च्या पाठीवर स्वत:ला झोकून दिले आणि पुढे दोन्ही हातांनी बाल्कनी पकडली. त्यानंतर तिने उडी मारली.
आश्चर्याची गोष्ट म्हणजे बाल्कनीत उभ्या असलेल्या कुणीतरी ते मोबाईलवर कैद केलं आहे. मुलगी खाली पडताच काही लोकांना तिला पकडायचे होते पण तिला पकडता आले नाही.
OMG!pic.twitter.com/OTdgNr00wO
— You Fecking Idiot (@YoufeckingIdiot) October 27, 2022
इतक्या गोंधळात ती खाली जोरात पडते पडली. तिला दुखापत झाली असावी. हा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे.