पत्नीला बिकनी घालता यावी म्हणून अख्खे आयलँड विकत घेतले, किंमत 374 कोटी

| Updated on: Sep 29, 2024 | 11:42 AM

सौदी अल नादक नेहमी सोशल मीडियावर तिच्या लक्झरी लाइफस्टाइलचे फोटो अन् व्हिडिओ शेअर करत असते. आता बेट विकत घेतल्याच्या व्हिडिओनंतर ती सोशल मीडिया ट्रोल होत आहे. काही जणांनी तिचा दावा खोटा असल्याचे म्हटले आहे. काही जणांनी तिचा बिकनीचा फोटोची अपेक्षा व्यक्त केली आहे.

पत्नीला बिकनी घालता यावी म्हणून अख्खे आयलँड विकत घेतले, किंमत 374 कोटी
सौदी अल नादक
Follow us on

शाहजहांने त्याची पत्नी मुमताजसाठी ताजमहल बनले. ते जगातील सात आश्चर्यापैकी एक मानले जाते. आता दुबईतील एकाने पत्नीशी असलेले प्रेम व्यक्त करण्यासाठी संपूर्ण आयलँड विकत घेतले आहे. दुबईतील महिलेने सोशल मीडियावर हा दावा केला आहे. इस्टांग्रामवर व्हिडिओ शेअर करत तिने लिहिले आहे की, समुद्राच्या किनारी मला सुरक्षित वाटावे म्हणून माझ्या पतीने आयलँडच विकत घेतले आहे. हे आयलँड विकत घेणारा दुबईतील कोट्यधीश जमाल अल नादक आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये म्हटले आहे की, “POV तुला बिकनी परिधान करायची होती म्हणून तुझ्या कोट्यधीश पतीने एक बेटच खरेदी केले.

26 वर्षीय सौदी अल नादक हा उद्योगपती आहे. सौदी ही दुबईतील उद्योगपती जमाल अल नादक याची ब्रिटीश वंशाची पत्नी आहे. हे हाय-प्रोफाइल जोडपे दुबईमध्ये शिकत होते तेव्हा भेटले. त्यांच्या लग्नाला तीन वर्षांहून अधिक काळ झाला आहे. सौदी ही सोशल मीडियावर नेहमी सक्रीय असते. तिच्या आलीशान जीवनशैलीचे व्हिडिओ ती नेहमी टाकत असते.

हे सुद्धा वाचा

काय आहे त्या व्हिडिओत

सौदी अल नादकने आता एक व्हिडिओ बनवला असून त्यात दावा केला आहे की तिच्या पतीने एक संपूर्ण बेट तिच्यासाठी विकत घेतले आहे. तिच्या या व्हिडिओला आठवड्याभरात 24 लाखो व्ह्यूजसह मिळाल्या आहेत. हा व्हिडिओ इंस्टाग्रामवर चांगलाच व्हायरल झाला आहे. सौदीने म्हटले की, दुबईस्थित तिचा नवरा गुंतवणूक म्हणून बेट खरेदी करण्याचा विचार करत होता. माझ्या पतीला मला समुद्रकिनाऱ्यावर सुरक्षित वाटावे अशी इच्छा होती. म्हणून हे बेट विकत घेतले आहे. सौदीने गोपनीयता आणि सुरक्षिततेच्या कारणांमुळे हे आयलँड नेमके कुठे घेतले आहे, ते सांगण्यास नकार दिला. परंतु हे बेट घेण्यासाठी सुमारे 374 कोटी रुपये खर्च केले असल्याचे म्हटले आहे.

सौदी अल नादक नेहमी सोशल मीडियावर तिच्या लक्झरी लाइफस्टाइलचे फोटो अन् व्हिडिओ शेअर करत असते. आता बेट विकत घेतल्याच्या व्हिडिओनंतर ती सोशल मीडिया ट्रोल होत आहे. काही जणांनी तिचा दावा खोटा असल्याचे म्हटले आहे. काही जणांनी तिचा बिकनीचा फोटोची अपेक्षा व्यक्त केली आहे.