बेंगळुरूमधून एक धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे, जो सोशल मीडियावर वेगाने शेअर केला जात आहे. यामध्ये एक वृद्ध व्यक्ती स्कूटीवरून रस्त्यावर फरफटत जाताना दिसत आहे. या घटनेचा धक्कादायक व्हिडिओ ANI या वृत्तसंस्थेने ट्विटरवर पोस्ट केला असून बेंगळुरूच्या मगदी रोडवर एका वृद्ध व्यक्तीला स्कूटरच्या मागे फरफटत नेल्याची माहिती समोर आली आहे. या व्यक्तीवर शहरातील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पोलिसांनी दुचाकी चालकाला पीएस गोविंदराज नगर येथून अटक केली आहे. व्हायरल व्हिडिओमध्ये एक व्यक्ती स्कूटी चालवताना दिसत आहे. एवढं सगळं होत असताना हा माणूस गाडी थांबवण्याऐवजी गाडी पळवत आहे. त्यानंतर काही पादचाऱ्यांनी स्कूटीचालकाला अडवून वृद्धाचा जीव वाचवला.
असा दावा केला जात आहे की, स्कूटी स्वाराने वृद्धाच्या कारला धडक दिली, त्यानंतर त्याने त्या व्यक्तीला थांबवण्याचा प्रयत्न केला. पण तो पळून जाऊ लागला. अशा तऱ्हेने त्या म्हाताऱ्याने पाठीमागून या व्यक्तीची स्कूटी पकडली. जेणेकरून तो पळून जाऊ शकणार नाही.
पण त्या व्यक्तीने स्कूटी पळवली आणि वृद्ध व्यक्तीला आपल्या गाडीमागे ‘एक किलोमीटर’ खेचत नेले. आता या व्हिडीओमुळे लोक संतप्त झाले आहेत. एका युजरने लिहिलं- “माणुसकी नाही, एका वृद्ध व्यक्तीला कसं ओढलं जातंय, पाहिलंही नाही!”
#WATCH | Man being dragged behind a scooter on Bengaluru’s Magadi road
The victim is currently under medical treatment a city hospital. The two-wheeler driver has been apprehended by the police at PS Govindaraj Nagar: DCP West Bengaluru
(Video verified by Police) pic.twitter.com/nntPxaZxSu
— ANI (@ANI) January 17, 2023
आणखी एक जण म्हणाला- या व्यक्तीवर कडक कारवाई झाली पाहिजे. त्याचप्रमाणे अनेक युजर्स स्कूटी रायडरवर टीका करत आहेत. त्याचबरोबर त्याला कडक शिक्षा व्हावी, अशी मागणीही केली जात आहे.