म्हणायला आयुष्य खूप सुंदर आहे, पण काहींच्या आयुष्यात अशी संकटं येतात, की ते हार मानतात. पण त्याचवेळी काही माणसे अशी असतात की, त्यांना पराभवालाही हरवण्याची सवय असते. सध्या एका आजीचं नेटकऱ्यांकडून कौतुक होत आहे. कारण तिने पराभव स्वीकारला नाही. सध्याला पुण्यात राहणारी एक गरीब आजी, जी आर्थिक परिस्थितीला कंटाळून भीख न मागता, या वयातही एक छोटा व्यवसाय करते आहे. (Elderly woman selling pens on street story goes viral on social media)
मिळालेल्या माहितीनुसार, या आजीचं नाव रतन आहे, ती पुण्यातील एमजी रोडवर पेन विकते. ती बॉक्समध्ये पेन ठेवून लोकांना विकते. पण ज्या पेटीत ठेऊन विकते, त्या पेटीवर लिहलेलं महत्त्वाचं आहे. पेटीवर लिहलेलं आहे की, ‘मला कोणाकडे भीक मागायची नाही. कृपया 10 रुपयात निळा पेन खरेदी करा, धन्यवाद, आशीर्वाद. खरं म्हणजे आजच्या जगात असा जिवंतपणा कुठे पाहायला मिळेल. लोक स्त्रीच्या या भावनेला मनापासून सलाम करत आहेत. या आजीचा फोटो खासदार विजय साई रेड्डी व्ही. यांनी शेअर केला आहे.
व्हिडीओ पाहा:
रतन आजीची गोष्ट सोशल मीडियावर व्हायरल होताच त्यांची जोरदार स्तुती केली. अनेक युजर्सने या पोस्टलाही सलाम केला आणि त्याला त्यांची प्रेरणा म्हटले. आजीची गोष्ट शेअर करताना अनेक लोकांनी लिहिले की, जेव्हा तुम्ही आयुष्यात स्वतःला एक पराभूत समजत असाल, तेव्हा त्यांच्याकडून प्रेरणा घ्या, कारण असे लोक जगात खूप निवडक असतात. दुसर्याने लिहिले की, आयुष्य कितीही अडथळे आले तरी थांबू नका. असे काही लोक आहेत ज्यांनी आता त्यांच्या मेहनतीच्या जोरावर आयुष्य जगून दाखवलं आहे.
हेही पाहा: