एकेकाळी पृथ्वीवर फक्त जंगले दिसत होती, पण आता जंगले कमी झाली आहेत. जंगले तोडून शहरे उभी केली जात आहेत, मग त्या जंगलात राहणारे प्राणी कुठे जातात? त्यानंतर ते मानवी भागात जातात. आपण पाहिले असेल की अनेकवेळा सिंह, वाघ यांसारखे धोकादायक प्राणीही अन्नाच्या शोधात मानवी वस्त्यांमध्ये घुसतात किंवा भटकतात आणि मग हाहाकार माजवू लागतात. या बाबतीत हत्तीही कमी नाहीत. सध्या सोशल मीडियावर हत्तीचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, जो खूप चकीत करणारा आहे.
या व्हिडिओमध्ये एक हत्ती अचानक चालत्या वाहनावर हल्ला करताना दिसत आहे. या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की रस्त्याच्या मधोमध एक हत्ती उभा आहे आणि त्याच्या समोरच एक ट्रॉली कारदेखील उभी आहे. कदाचित हत्ती रस्ता ओलांडण्याचा प्रयत्न करत असावा, पण अचानक गाडी समोर आली, तो घाबरला आणि मग त्यानंतर हत्ती त्या गाडीला धक्का देऊ लागला. त्याने आधी गाडी रस्त्यावरून ढकलली आणि नंतर एका झटक्यात उलटली. त्याचा राग शांत न झाल्याने त्याने गाडी अधिक ढकलून पुन्हा वळवली आणि रस्त्यावरून काढून टाकली.
हा धोकादायक व्हिडिओ आयपीएस अधिकारी रुपिन शर्मा यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटरवर शेअर केला असून हत्तीसंदर्भात कॅप्शनमध्ये लिहिले आहे, ‘तू माझ्या भागात घर का बांधलेस’. हा व्हिडिओ गुवाहाटी मधला असल्याचं सांगितलं जातंय. 35 सेकंदाचा हा व्हिडिओ आतापर्यंत 35 हजारांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे, तर शेकडो लोकांनी हा व्हिडिओ लाइक देखील केला आहे.
तुमने मेरे इलाके में #घर क्यों बनाया ????#Narengi #Guwahati today.??@susantananda3 @ParveenKaswan @ipsvijrk @SudhaRamenIFS @moefcc pic.twitter.com/puaHBG5mQM
— Rupin Sharma IPS (@rupin1992) January 14, 2023
त्याचबरोबर हा व्हिडिओ पाहिल्यानंतर लोकांनी वेगवेगळ्या प्रतिक्रियाही दिल्या आहेत. एका युजरने लिहिले की, ‘ही घटना घडली तेव्हा मी तिथे होतो. हे खूप भीतीदायक होते.”