हत्तीच्या सामर्थ्यापुढे ‘जंगलाचा राजा’ सिंह सुद्धा काहीच नाही. फक्त ताकद नाही… हत्ती खूप हुशार असतात. ही व्हायरल क्लिप त्याचाच पुरावा आहे. वास्तविक, हत्ती एक लोखंडाचं कुंपण पार करत असतो. त्याआधी हत्ती चेक करतो की या कुंपणात करंट आहे का. एक एका तारेवर तो पाय ठेवून बघतो. जसं त्याला कळतं की या कुंपणावर करंट आहे तसा तो हत्ती कुंपणाच्या लाकडावर लाथ मारतो. बघा म्हणजे हत्ती इतका हुशार आहे की करंट बसू नये म्हणून तो त्या लाकडाला लाथ मारतोय.
हत्तीची हुशारी कॅमेऱ्यात कैद झाली, ते पाहून इंटरनेटवाले गजराजचे चाहते झाले. वन्यप्राणी रस्त्यावर येऊन वाहनाला धडकू नयेत म्हणून रस्ते अपघात कमी व्हावेत, यासाठी असे कुंपण बसविले जाते.
आयएफएस अधिकारी @Geethanjali_IFS यांनी 5 डिसेंबर रोजी ‘उत्तराखंड वन संशोधन संस्था’ ने ट्विट केलेला एक व्हिडिओ शेअर केला आणि लिहिले- स्मार्ट प्राणी.
Smarter beings ? #Elephants pic.twitter.com/zLakeKLeIq
— Geethanjali K IFS (@Geethanjali_IFS) December 5, 2022
त्याचबरोबर @ukfrihaldwani आपल्या ट्विटमध्ये लिहिले- हत्तीच्या अद्भुत बुद्धिमत्तेचे आणखी एक उदाहरण. जमिनीवर आढळणाऱ्या कोणत्याही प्राण्यामध्ये त्यांचा मेंदू हा सर्वांत मोठा असतो. या क्लिपला 14 हजारांहून अधिक व्ह्यूज आणि लाईक्स मिळाले आहेत.