पाणीपुरी! पाणीपुरी कुणाला आवडत नाही? कुणी असं आहेका जे पाणीपुरीला नाही म्हणू शकतं? अजून कुठला व्यवसाय चालू न चालू पाणीपुरी वाल्याचा नक्की चालणार याची खात्री भारतातला कुठलाही माणूस देऊ शकतो. बरं आता जो व्हिडीओ समोर आलाय तो अजूनच वाढीव आहे. कारण यात चक्क हत्ती पाणीपुरी खातोय. कधी पाहिलंय का हत्तीला पाणीपुरी खाताना? जशी माणसं गपागप एकामागून एक पाणीपुरी खातात तसाच हा हत्ती खातोय.
A video of a jumbo from Assam has recently gone viral on social media. In the footage, the elephant can be seen hogging pani puris. The vendor also happily prepares the puffs one by one and hands them over to the elephant who had extended its tusk. #Viral #Elephant #panipuri pic.twitter.com/BrsKYd09Dh
— Odisha Basi ( ଓଡ଼ିଶାବାସୀ ) (@OdishaBasii) October 12, 2022
आसामच्या तेजपूरमध्ये हत्ती गोलगप्पे खात असतानाचा व्हिडीओ व्हायरल झालाय. हा व्हिडीओ बघून आपल्या चेहऱ्यावर सुद्धा स्मित हास्य येतं इतका गोंडस हा व्हिडीओ आहे.
पाणीपुरी,पुचका, गोलगप्पे या नावाने ओळखले जाणारे हे स्ट्रीट फूड देशभरातील लाखो लोकांच्या पसंतीस उतरले आहे.
एका हत्तीचा गोलगप्पे खातानाचा सुंदर व्हिडीओ काढण्यात आला. हा व्हिडीओ बघताना लोकांना प्रश्न पडतोय, अगदी माणसासारखं हा हत्ती पाणीपुरी कसा खाऊ शकतो?
हत्तींनाही माणसांसारख्या मसालेदार गोष्टी खायला आवडतात का? गोलगप्पा समोर असतानाही नकार देणं सोपं नसतं, मग हत्ती मागे कसा राहणार?
या क्लिपची सुरुवात एका पाणीपुरी वाल्याच्या शेजारी उभ्या असलेल्या हत्तीपासून होते. पाणीपुरी वाला एकापाठोपाठ एक पाणीपुरी हत्तीला खाऊ घालतोय.
व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की पाणीपुरी वाला त्याच्या खास पाहुण्याची सेवा करण्यात व्यस्त आहे. इतर ग्राहक मात्र त्यांच्या पाळीची वाट बघतायत.