Elon Musk: काय आहे हे “वीगोवी”? जे घेतल्याने 51 व्या वर्षीही एलन मस्क 30-32 चे दिसतात

| Updated on: Oct 13, 2022 | 6:23 PM

सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटरवरील एका वापरकर्त्याने विचारले की तुम्ही छान दिसण्यासाठी, वजन उचलणे किंवा डाएट सारखे प्रकार करता का?

Elon Musk: काय आहे हे वीगोवी? जे घेतल्याने 51 व्या वर्षीही एलन मस्क 30-32 चे दिसतात
Elon Musk
Image Credit source: Social Media
Follow us on

जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती एलन मस्क यांच्या वक्तव्यामुळेही बरीच चर्चा सुरू आहे. सोशल मीडियावरील त्यांच्या पोस्टमुळे ते जगभरात चर्चेत असतात. अलिकडेच त्यांनी एक गुपित सांगितलंय, जे जाणून घेण्यात तुम्हाला नक्कीच इंटरेस्ट असेल. एका प्रश्नाच्या उत्तरात त्यांनी इतकं सुंदर, तंदुरुस्त दिसण्यासाठी आपण काय करतो हे सांगितलंय. आला ना इंटरेस्ट?

खरं तर, सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटरवरील एका वापरकर्त्याने विचारले की तुम्ही छान दिसण्यासाठी, वजन उचलणे किंवा डाएट सारखे प्रकार करता का?

या ट्विटला उत्तर देताना टेस्लाच्या सीईओंनी लिहिले की, फास्टिंग आणि वीगोवी. एलन मस्क यांच्या या उत्तरानंतर लोकांना फास्टिंग समजला, पण वीगोवीचा अर्थ अनेकांना कळला नाही. जाणून घेऊयात काय आहे ते.

वीगोवी हे प्रत्यक्षात एक औषध आहे. अमेरिकेच्या अन्न व औषध प्रशासनाने गेल्या वर्षी वीगोवी औषधाला वजन कमी करण्याचे औषध म्हणून मान्यता दिली.

मधुमेहावरील उपचारात याचा वापर होत असला तरी वजन कमी करण्याचे औषध म्हणून आता तो अधिकाधिक प्रसिद्ध होत आहे.

Vigovi ही डॅनिश फार्मास्युटिकल कंपनी Novo Nordisk’sच्या सेमाग्लूटाइड औषधाची अपडेटेड आवृत्ती आहे. या औषधामुळे शरीरातील भूक वाढवणारे हार्मोन्स संतुलित होतात आणि पचनक्रिया मंदावते. ज्यामुळे जास्त काळ भूक लागत नाही, असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे.

हे औषध म्हणजे लठ्ठ व्यक्तीला आठवड्यातून एकदा इंजेक्शन दिले जाते आणि हे इंजेक्शन 68 आठवड्यांत 15 ते 20 टक्के वजन कमी करते आणि त्याचे परिणाम खूप काळ टिकतो.

डॉक्टरांच्या सल्ल्याने हे औषध वापरलं जातं हे लक्षात घ्या.

अनेक सेलिब्रिटींनीही वजन कमी करण्यासाठी या महागड्या औषधाचा वापर करायला सुरुवात केली आहे, ज्यामुळे त्याचा तुटवडा निर्माण झाला आहे.

या औषधाच्या महिनाभराच्या डोसची किंमत १,२०० डॉलर (सुमारे ९८ हजार भारतीय रुपये) आणि १,५०० डॉलर (सुमारे एक लाख २३ हजार भारतीय रुपये) इतकी असल्याचे सांगितले जात आहे.

एलन मस्क वयाच्या ५१ व्या वर्षीही ३०-३२ वर्षांच्या मुलासारखा दिसतो. अनेकदा अनेक जण ट्विटरवर त्याच्याकडून त्याच्या शरीरयष्टीचे रहस्य शोधण्याचा प्रयत्न करतात. आता त्याचं उत्तर त्यानं स्वत:च दिलंय.