अमेरिकेतील नेब्रास्का राज्यातील मोनोव्ही येथे राहणारी एल्सी आयलर ही गावातील एकमेव रहिवासी आहे. ती स्वत:हून कर भरते, महापौरपदाच्या निवडणुकीची जाहिरात करते आणि स्वत:साठी मतदान करते. 2004 मध्ये जेव्हा तिच्या पतीचे निधन झाले तेव्हा या निर्जन शहरात ती एकटीच उरली आणि तिचे एकाकी जीवन सुरू झाले.
एल्सी आयलर या शहराच्या महापौर, बार टेंडर आणि ग्रंथपाल आहेत. जगातील संपूर्ण जनता महामारी आणि कोविड नियमांचे पालन करत असताना, आयलर स्वत:ला खूप एकटं समजते. कित्येकदा लोक तिला भेटण्यासाठी खूप लांबून येतात.
दुसऱ्या महायुद्धानंतर शेतीची परिस्थिती आणि ग्रामीण अर्थव्यवस्था अधिकच बिकट झाली आणि त्यामुळे मोनोव्हीतील लोकांना ग्रामीण भागात यावं लागलं. पोस्ट ऑफिस आणि शेवटची तीन किराणा दुकाने 1967 ते 1970 दरम्यान, तसेच शाळा 1974 मध्ये बंद झाली.
या महिलेची मुलेही कामाच्या शोधात बाहेर पडली. या नंतर ही महिला आणि तिचा पती असे दोघेच मोनोवी मध्ये राहायला होते. आता मात्र पतीच्या निधनानंतर ही महिला या गावात एकटीच रहिवासी आहे. सध्या आयलर एकटीच आपलं शहर सांभाळते.