सोशल मीडियावर सध्या एक धक्कादायक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये पोलिसांच्या गणवेशातील एक व्यक्ती रस्त्याच्या मधोमध उभा असल्याचे दिसत आहे. त्याच्यासोबत दोन मुलंही आहेत. हा व्यक्ती 50 हजार रुपयांना आपली मुले विकायचं असल्याचं ओरडत आहे. ज्याने हा व्हिडिओ पाहिला तो धक्काच बसला. चला तर मग जाणून घेऊया काय आहे प्रकरण? (Emotional Father Viral Video in which Pakistani Cop trying to sell his own children Know the shocking reason)
व्हाइस या वेबसाइटच्या रिपोर्टनुसार, हे धक्कादायक प्रकरण पाकिस्तानातील आहे. व्हिडिओमध्ये दिसणारी व्यक्ती निसार लाशारी असून तो सिंध प्रांतातील घोटकी जिल्ह्यातील रहिवासी आहे. तो तिथल्या कारागृहात काम करतो. हा व्हिडीओ व्हायरल होताच पाकिस्तानचं एक काळं सत्यही समोर आलं, ज्यामध्ये एका पोलीस कर्मचाऱ्याला आपल्या मुलाला रस्त्यावर विकण्याची इच्छा होऊ शकते हे कळतं. हा व्हिडिओ शेख सरमद नावाच्या व्यक्तीने त्याच्या ट्विटर अकाऊंटवर शेअर केला आहे.
चला हा व्हिडिओ पाहूया.
گھوٹکی کے پولیس اہلکار کو بچے کے علاج کے لیے چھٹی نہ ملی اور لاڑکانہ تبادلہ کردیا گیا، چھٹی لینے اور تبادلہ رکوانے کے لیے افسران کو پچاس ھزار روپے رشوت دینی پڑے گی، اہلکار پچاس ھزار میں ایک بیٹا بیچنے کی آوازیں لگاتا رہا۔
ہائے انسانیت کہاں ہے ?? pic.twitter.com/i9hRF7IsNQ— Sheikh Sarmad (@ShSarmad71) November 13, 2021
निसार लशारी यांनी वेबसाईटला सांगितले की, मला खूप असहाय्य वाटत आहे. मला सुट्टी देण्याच्या बदल्यात वरिष्ठ लाच मागत आहे. निसार लाशारी यांच्या म्हणण्यानुसार त्यांना त्यांच्या मुलाच्या उपचारासाठी रजेची गरज होती. पण जेव्हा तो बॉसला लाच देऊ शकला नाही तेव्हा त्याची रजा रद्द करण्यात आली. एवढेच नाही तर शहरापासून 120 किमी दूर असलेल्या लारकाना या ठिकाणी त्याची बदली करण्यात आली.
लाचेची रक्कम न दिल्याने ही शिक्षा झाल्याचं या पोलिसाचे म्हणणं आहे. निसार म्हणतो की, तो कराचीला जाऊन तुरुंग अधीक्षकांकडे तक्रारही करू शकत नाही. कारण त्याचा बॉस इतका दमदार आहे की, त्याच्यावर कोणतीही कारवाई होत नाही. त्याचे वरपर्यंत संबंध आहेत. निसार म्हणाले, ‘माझ्या मुलाच्या उपचाराचा खर्च मी उचलावा किंवा लाच द्यावी हाच पर्याय आहे. माझं मन सुन्न झालं आहे. काय करावं समजत नव्हतं.” याच कारणामुळे मी एवढं मोठं पाऊल उचललं.
वेबसाइटच्या माहितीनुसार, चांगली गोष्ट म्हणजे निसारचा व्हायरल व्हिडिओ त्याच्या बाजूने गेला. जेव्हा हे प्रकरण सिंधचे मुख्यमंत्री मुराद अली शाह यांच्यापर्यंत पोहोचलं, तेव्हा त्यांनी या प्रकरणात हस्तक्षेप केला आणि निसार यांना घोटकीमध्येच नोकरी सुरू ठेवण्याचे आदेश दिले. एवढंच नाही तर मुलावर उपचार करण्यासाठी निसारला 14 दिवसांची रजाही देण्यात आली. शिवाय लाच मागणाऱ्या अधिकाऱ्यावर कारवाई झाल्याचीही बातमी आहे.
हेही पाहा: