Engineer’s Day च्या निमित्ताने सोशल मीडियावर मिम्सचा पाऊस!

| Updated on: Sep 15, 2023 | 7:26 PM

आज अभियंता दिन साजरा केला जात आहे. हा दिवस सर्व अभियंत्यांना समर्पित आहे. देशाला विकासाच्या वाटेवर चालवण्यात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या अभियंत्यांचे महत्त्व आणि मोलाचे योगदान या दिवशी स्मरणात ठेवले जाते. या दिवशी देशाचे महान अभियंता आणि भारतरत्न एम. विश्वेश्वरय्या यांचा जन्मदिवस आहे

Engineer’s Day च्या निमित्ताने सोशल मीडियावर मिम्सचा पाऊस!
engineers day
Follow us on

मुंबई: आज आहे अभियंता दिवस! महान अभियंता आणि भारतरत्न एम. विश्वेश्वरय्या यांचा आज जन्मदिवस. हा दिवस इंजिनीअर्स डे म्हणून साजरा केला जातो. आज सकाळपासून सगळ्यांना इंजिनिअर्स डे च्या शुभेच्छा दिल्या जातायत. देशाच्या विकासात अभियंताचं किती मोठं योगदान आहे हे वेगळं सांगायची गरज नाही. पण इंजिनिअर म्हणलं की सगळ्यांचा एकच ठरलेला प्रश्न असतो, “इंजिनिअरिंग नंतर जय करणार?” या प्रश्नाचा अर्थ काय? का विचारला जातो? अशी का खिल्ली उडवली जाते? कारण अनेक इंजिनिअर्स डिग्री घेतल्या नंतर वेगळ्या क्षेत्रात जातात. असे अनेक क्षेत्र आहेत ज्यात इंजिनिअर्स पुढे आहेत. कला क्षेत्रात तर त्यांचा कुणी हात धरू शकत नाही. याच विषयाला धरून अभियंता दिवस असला की खूप मिम्स व्हायरल होतात. बघुयात ते मिम्स…