मुंबई : पशूंना मानवाच्या काही सवयी लागल्याचं आपण पाहातो. पण कावळ्याला जर माणसाचं व्यसन जडू लागलं तर… तुम्हाला हे खरं वाटणार नाही. पण अशी एक बातमी समोर आली आहे. इंग्लंडमधील एका माणसाची कावळ्याशी (Crow) चांगलीच मैत्री झाली. यात हे दोघे मित्र सिगारेट ओढत असे. डेली मेलच्या वृत्तानुसार, 2020 मध्ये कोरोना व्हायरसमुळे (Corona) जगभरात लॉकडाऊन होते. यादरम्यान, इंग्लंडमधील ईस्ट ससेक्स येथे राहणारा पीट आपला बहुतेक वेळ त्याच्या बागेत घालवत असे. याच काळात त्याची कावळ्याशी ओळख झाली. पीट वारंवार सिगारेट ओढत असे. त्याची ही सवय कावळ्याने पाहिली. अन् तोही सिगारेट ओढू लागला.
इंग्लंडमधील एका माणसाची कावळ्याशी चांगलीच मैत्री झाली. यात हे दोघे मित्र सिगारेट ओढत असे. डेली मेलच्या वृत्तानुसार, 2020 मध्ये कोरोना व्हायरसमुळे जगभरात लॉकडाऊन होते. यादरम्यान, इंग्लंडमधील ईस्ट ससेक्स येथे राहणारा पीट आपला बहुतेक वेळ त्याच्या बागेत घालवत असे. याच काळात त्याची कावळ्याशी ओळख झाली. पीट वारंवार सिगारेट ओढत असे. त्याची ही सवय कावळ्याने पाहिली. अन् तोही सिगारेट ओढू लागला.
याविषयी पीटने माध्यमांना माहिती दिली. “मी लॉकडाऊनच्या काळात नियमितपणे बागेत जात असे. त्यावेळी माझी एका कावळ्याशी ओळख झाली. एकदा मी सिगारेट ओढत असताना हा कावळा आला. त्याने मला सिगारेट ओढताना पाहिलं. तो ती सिगारेट माझ्या हातातून खेचू लागला”,असं त्याने सांगितलं.
पुढे पीट म्हणाला, “जेव्हा कावळ्याने पहिल्यांदा सिगारेट चाखली, त्यानंतर त्याला सिगारेटचे व्यसन लागले. यानंतर तो रोज माझ्याकडे येऊ लागला आणि आम्ही दोघेही एकत्र सिगारेट पीत असे. पीटने या कावळ्याला आपला मित्र बनवून त्याचे नाव क्रेग ठेवले होते.अनेकवेळा क्रेग त्याच्या तोंडातून सिगारेट हिसकावून प्यायचा. या दोघांची मैत्री अनेक महिने टिकली”,
मागच्या काही महिन्यांपासून क्रेगने पीटच्या बागेत जाणे बंद केलं आहे. मला भीती वाटते की जास्त सिगारेट प्यायल्याने त्या कावळ्याचा मृत्यू झाला असावा. गेल्यावर्षीच्या ऑक्टोबरपासून तो त्यांना दिसला नाही. मी माझ्या अनोख्या स्मोकिंग पार्टनरसोबत 6 हजाराहून अधिक फोटो काढले आहेत. या चित्रांचे त्यांनी NFT कलाकृतीत रूपांतर केले आहे”, असं पीटने सांगितलं.
संबंधित बातम्या