जगात असे अनेक लोक आहेत ज्यांनी आपल्या विश्वविक्रमाने सर्वांना चकित केले आहे. कुणी टी-शर्टची घडी घालून विश्वविक्रम केला आहे, कुणी बर्गर खाऊन, कुणी खूप फिरून तो विक्रम केला आहे. हे सर्व रेकॉर्ड्स असे आहेत की ते खूप युनिक आहेत. अशा एका अनोख्या विश्वविक्रमाची निर्मिती करणाऱ्या अशाच एका व्यक्तीची हल्ली खूप चर्चा होतेय.
तुम्ही रेस्टॉरंटमध्ये खाल्ले असेलच, पण दिवसभरात किती रेस्टॉरंट्स खाऊ शकता? साहजिकच तुमचे उत्तर दोन-तीन असेल, पण ज्या व्यक्तीबद्दल आम्ही तुम्हाला सांगणार आहोत, त्याने एका दिवसात 2-3 नव्हे तर एकूण 18 रेस्टॉरंटमध्ये जेवण केलंय. या अनोख्या कामगिरीमुळे त्याच्या नावाची गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झाली आहे.
एरिक असं हा अनोखा विश्वविक्रम रचणाऱ्या व्यक्तीचं नाव आहे. एरिक अमेरिकेचा रहिवासी आहे. गिनीज वर्ल्ड रेकॉर्डनुसार एरिकला सुरुवातीला रेस्टॉरंटमध्ये बसून जेवण खायला आवडत नव्हते, पण 2021 मध्ये कोरोना महामारीच्या वेळी तो एका ग्रुपमध्ये सामील झाला, ज्याच्या सदस्यांना वेगवेगळ्या रेस्टॉरंटमध्ये खाण्याची आवड होती.
रेस्तराँमध्ये जाऊन जेवण करून विश्वविक्रम का करू नये हे एरिकच्या मनात आलं. एरिकने जेव्हा ही कल्पना घेऊन गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्सशी संपर्क साधला, तेव्हा त्यालाही ही कल्पना खूप आवडली. एरिक आपला अनोखा विश्वविक्रम पूर्ण करण्यात गुंतला.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, एरिकने सुरुवातीला अनेक महिने प्लॅनिंग केलं आणि वेगवेगळ्या रेस्टॉरंट्समध्ये सीट बुक केली.
सुरुवातीला एरिकने सुमारे 80 रेस्टॉरंटशी संपर्क साधला, पण केवळ 10 रेस्टॉरंट्सनी प्रतिसाद दिला. मात्र, तरीही एरिकने आपले प्रयत्न सुरूच ठेवले.
अखेर 26 ऑक्टोबरला त्याने आपल्या विश्वविक्रम मोहिमेला सुरुवात केली. रिपोर्ट्सनुसार, एरिकने त्याच्या जेवणावर 494 डॉलर म्हणजेच जवळपास 40 हजार रुपये खर्च केले.
एरिकने विक्रम करण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. या आधीही त्याने दोन अनोखे विक्रम केले आहेत. 2021 मध्ये, त्याने सर्वात लांब टेबल टेनिस सर्व्हिस (15.57 मीटर) आणि सर्वात मोठा टेबल टेनिस बॉल मोझॅक (29.12 चौरस मीटर) खेळण्याचा विक्रम केलाय.