इस्लामाबाद: विश्वविक्रम कशा कशाचा होऊ शकतो? विचार करा. आजपर्यंत आपण विविध प्रकारचे विश्वविक्रम पाहिलेत. खाण्याचे, पिण्याचे, शरीरावर टॅटू काढण्याचे, डान्सचे असे अनेक विश्वविक्रम लोकांनी आपल्या नावावर केलेले आहेत. यात काही विचित्र गोष्टी पण आहेत. आपल्याला वाचून असं वाटतं अरे, या गोष्टीचाही विश्वविक्रम होऊ शकतो? असाच एक आगळावेगळा विश्वविक्रम केलाय पाकिस्तानातल्या एका कुटुंबाने. या कुटुंबाने मिळून हा विक्रम केलाय. आता तुम्ही म्हणाल कुटुंब मिळून कसं काय विश्वविक्रम करू शकतं? होय. या कुटुंबातल्या सगळ्या सदस्यांनी हा अनोखा विश्वविक्रम केलाय.
ज्या कुटुंबाने हा विक्रम केला त्या कुटुंबातील सर्वच सदस्यांचा यात समावेश आहे. यातला प्रत्येकजण एकाच तारखेला जन्माला आलाय. हाच विश्वविक्रम त्यांनी केलाय.कुटुंबातील सर्व नऊ सदस्यांमध्ये एक गोष्ट समान आहे, ती म्हणजे ते सर्व एकाच दिवशी जन्माला आले. गिनीज वर्ल्ड रेकॉर्डनुसार एका कुटुंबात नऊ जण आहेत. वडील अमीर अली, आई खुदेजा आणि त्यांची सात मुले सिंधु, ससुई, सपना, आमिर, अंबर, अम्मार, अहमर यांचा जन्म एकाच दिवशी झाला. सर्व मुले 19 ते 30 वयोगटातील आहेत.
पाकिस्तानमधील एका कुटुंबाने हा विक्रम केलाय. लरकानामधील हे विचित्र विश्वविक्रम करणारं कुटुंब यातील सर्वांचा 1 ऑगस्ट रोजी झाला होता. ‘एकाच दिवसात कुटुंबातील सर्वाधिक सदस्यांच्या जन्म’ हा जागतिक विक्रम आहे. आता येणारा 1 ऑगस्ट अमीर अली आणि खुदेजा साठी खूप खास आहे. विशेष म्हणजे याच दिवशी या जोडप्याचा लग्नाचा वाढदिवस देखील असतो. लग्नानंतर वर्षभरानंतर 1 ऑगस्टला मोठ्या मुलीचा जन्म झाला. एकाच दिवशी सर्वाधिक भावंडांचा जन्म झाल्याचा विक्रमही सात मुलांच्या नावावर असल्याचे गिनीज रेकॉर्ड बुकने उघड केले आहे.
1952 ते 1966 दरम्यान 20 फेब्रुवारी रोजी जन्मलेल्या अमेरिकन कमिन्स कुटुंबातील पाच मुलांच्या नावावर यापूर्वी हा विक्रम होता. पाकिस्तानी कुटुंबाचा शोध लागेपर्यंत या कुटुंबाचे नाव रेकॉर्डवर होते.