सोशल मीडियावर व्हिडिओंचा पाऊस पडत आहे. दररोज एक व्हिडिओ व्हायरल होत असतो. नुकताच ट्विटरवर एक व्हिडिओ व्हायरल झाला जो खूप खास आहे. असा व्हिडिओ तुम्ही यापूर्वी कधी पाहिला नसेल आणि भविष्यातही याची कल्पनाही करता येणार नाही. या व्हिडीओमध्ये बाप-लेकाची खूप चांगली जोडी दिसत आहे. हा व्हिडिओ एका युजरने ट्विटरवर शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये पिता-पुत्राची जोडी दिसत आहे, ज्यात वडील 105 वर्षांचे आणि मुलगा 74 वर्षांचा आहे. विशेष म्हणजे या व्हिडिओमध्ये मुलगा शिट्टी वाजवत आपल्या वडिलांना हे कोणतं गाणं आहे हे सांगत आहे. या व्हिडिओत वडील बेडवर पडलेले दिसत आहेत आणि त्यांचा मुलगा त्यांच्या शेजारी बसलेला आहे.
मुलगा वडिलांना खूश करण्याचा प्रयत्न करत आहे. सगळ्यात चांगली गोष्ट म्हणजे वडीलही चांगला प्रतिसाद देत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, हा व्हिडिओ दक्षिण भारतातील शहरातील असून दोघेही आपापल्या भाषेत बोलत आहेत. शेवटी जेव्हा मुलगा शिट्टी वाजवून शांत होतो आणि वडिलांना विचारतो की हे कोणतं गाणं आहे, तेव्हा वडीलही त्या गाण्याचं नाव सांगतात.
हे ऐकून आजूबाजूला बसलेले कुटुंबीयही टाळ्या वाजवू लागतात, सध्या तरी हा व्हिडिओ कुठून आलाय याची खात्री झालेली नाही. या व्हायरल पोस्टवर जगन्नाथन नावाच्या युजरने लिहिले की, हा त्याच्या कुटुंबाचा व्हिडिओ आहे. त्यांनी लिहिले की ते माझे वडील आहेत आणि ते 104 वर्षांचे आहेत. आता 19 जानेवारीला आम्ही त्यांचा 105 वा वाढदिवस साजरा केला आहे.
Father is 100+, son is 75. Can the coming generation sustain such relationships ? pic.twitter.com/QHhcqBSOnC
— Tweet-today?? (@goodpersonSrini) February 16, 2023
युजरने लिहिलं की, दुसरी व्यक्ती माझा भाऊ आहे. माझे वय 74 वर्षे आहे. यावर्षी 17 जानेवारीला मी माझा 75 वा वाढदिवस साजरा केला. सध्या हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे.