जगात दररोज हजारो रस्ते अपघात होतात, ज्यात लोकांना आपला जीव गमवावा लागतो. विशेषतः भारतात रस्ते अपघातांची संख्या खूप मोठी आहे, आणि ही खूप मोठी समस्या बनली आहे. म्हणूनच बऱ्याचदा वाहतूक पोलीस लोकांना पटवून देण्यासाठी नवनवीन प्रयत्न करत राहतात. सध्या सूरत पोलिसांनी रस्ता सुरक्षेबाबत जागृत करण्यासाठी एक व्हिडिओ शेअर केला आहे आणि तो काही वेळातच व्हायरल झाला आहे. इंटरनेटवर हा व्हिडीओ खूप लोकांना आवडत आहे. ( father drives a Car on wrong side of road daughter teaches him lesson Surat Traffic Police Educational Video )
या व्हिडिओमध्ये एक माणूस शाळेत नियम मोडल्याबद्दल आपल्या लहान मुलीला फटकारत आहे. मुलीशी बोलत असताना तो गाडीला चुकीच्या बाजूला नेतो. हे पाहून ती लहान मुलगी तिच्या वडिलांना सांगते की आता तुमच्या चुकीबद्दल तुम्हाला कोण फटकारणार. कारण आता तुम्हीही शॉर्ट कटसाठी चुकीच्या मार्गाने गाडी फिरवली आहे. सूरत पोलिसांनी शेअर केलेल्या पोस्टच्या कॅप्शनमध्ये असे लिहिले आहे, “चुकीच्या बाजूला वाहन चालवणे टाळा.”
व्हिडिओ पाहा:
हा व्हिडीओ पोस्ट करत सुरत पोलिसांनी लिहिले, “चुकीच्या दिशेने वाहन चालवणे तुम्हालाच नाही तर तुमच्यासह इतर नागरिकांनाही नुकसान पोहोचवते. जेव्हा आपण वाहतूक नियमांचे काटेकोरपणे पालन करू, तेव्हाच तरुण पिढीला त्यांचे महत्त्व कळेल आणि भविष्यात ते एक सुरक्षित चालक बनतील. ” हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे आणि लोक ही क्लिप पोस्ट केल्याबद्दल सूरत पोलिसांचे कौतुक करत आहेत.
या व्हिडिओमध्ये चिराग त्रिवेदी आणि दर्शनी त्रिवेदी यांनी भूमिका केल्या आहेत. या लघु व्हिडिओद्वारे गुजरात पोलिसांनी सामाजिक संदेश दिला आहे. ही पोस्ट सोशल मीडियावर शेअर होताच लोकांनी आपली प्रतिक्रिया वेगाने नोंदवायला सुरुवात केली. एका नेटकऱ्याने सांगितले की, जर तुम्हाला मुलीचा मुद्दाही समजला असेल तर क्वचितच कुणी रस्ते अपघातात मृत्यूमुखी पडेल.
हेही पाहा: