व्हिडीओ एखाद्या फिल्मच्या Action Scene सारखा, वडील Superman सारखे! मुलगी वाचली, वडिलांनी वाचवली…

| Updated on: Oct 15, 2022 | 10:55 AM

कधी कधी तर प्रश्न पडतो, आपल्यावर येणाऱ्या संकटांची भनक आपल्या घरच्यांना आधीच कशी लागते? आता बघा ना, हा व्हिडीओ असाच काहीसा आहे.

व्हिडीओ एखाद्या फिल्मच्या Action Scene सारखा, वडील Superman सारखे! मुलगी वाचली, वडिलांनी वाचवली...
accident
Image Credit source: Social Media
Follow us on

आपल्याला वाचविण्यासाठी फक्त आपले आई वडील आपला जीव धोक्यात घालू शकतात. नाही का? हे समजा कुणालाही विचारलं तरी कुणीही क्षणाचाही विलंब न करता हो च म्हणेल. ज्यांनी जन्म दिलाय ते आपला जीव वाचवायला मागे पुढे पाहणार नाहीत. भूतकाळातल्या अशा किती तरी घटना असतील ज्यात आपण फक्त आणि फक्त आपल्या आई वडिलांमुळे वाचलोय. कधी कधी तर प्रश्न पडतो, आपल्यावर येणाऱ्या संकटांची भनक आपल्या घरच्यांना आधीच कशी लागते? आता बघा ना, हा व्हिडीओ असाच काहीसा आहे. यात ही जोरात सायकल वरून येते. तिच्या वडिलांना ती येते तेव्हाच कळतं, “ही पडणार”. मग ते तिला आधीच वाचवतात.

हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इंस्टाग्रामवर शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडिओ पाहून तुम्हाला धक्का बसेल.

या व्हिडीओमध्ये काही लोक रस्त्यावर उभे असलेले दिसत आहेत. पण इथे काय होणार आहे याची कल्पनाही या सर्वांना नसेल.

या व्हिडीओमध्ये एक कार भरधाव वेगाने रस्त्यावर धावताना दिसत आहे. काही सेकंदानंतर एक मुलगी सायकलवरून येताना दिसते.

ही मुलगी प्रचंड स्पीड मध्ये येतीये. हिच्या सायकलचं वेग प्रचंड आहे, हा वेग तिला सुद्धा नंतर आटोक्यात आणता येत नाही हे कळून येतंय.

मुलगी लोखंडी खांबावर आदळणार इतक्यात तिचे वडील धावत जाऊन मुलीला सायकलवरून उचलून खाली ठेवतात. हे बघताना एखाद्या फिल्मच्या Action Scene सारखं वाटतं.

सायकल मात्र खांबाला जाऊन धडकते. चांगली गोष्ट म्हणजे मुलाला इजा होत नाही. तिचा जीव वाचतो. अनेक युझर्स व्हिडिओ पाहून प्रतिक्रिया देतायत.

या व्हिडिओला भरपूर व्ह्यूज आहेत. आतापर्यंत लाखो लोकांनी हा व्हिडीओ पाहिला असून हजारो लोकांनी हा व्हिडिओ लाईकही केला आहे.

कमेंट सेक्शनमध्येही लोकांच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया पाहायला मिळत आहेत. काही लोक वडिलांना सुपरहिरो म्हणतायत तर काही जण मुलीला नशीबवान म्हणत आहेत.