मुंबई : असं म्हणतात की आईच्या प्रेमाला सीमा नसतात. ती ज्या पद्धतीने आपल्या मुलांवर प्रेम करते, त्याची तुलना होऊ शकत नाही. त्याची उदाहरणंदेखील वेळोवेळी समोर आली आहेत. आईच्या निस्वार्थ प्रेमाची साक्ष देणारा असाच एक व्हिडीओ सध्या समोर आला आहे. हा व्हिडीओ पाहून नेटकरी भावुक झाले आहेत.
व्हायरल होत असलेला व्हिडीओ कुठला आहे, याची माहिती मिळू शकलेली नाही. मात्र, त्याला पाहून अनेकांचा उर भरून आला आहे. व्हिडीओमध्ये हरणाचा कळप दिसत आहे. अनेक हरिणांनी पाण्यात उडी घेतली आहे. पाण्यात उडी घेऊन सगळे हरिण किनाऱ्याच्या दुसऱ्या बाजूने जाण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र, यावेळी सर्व हरणांवर मोठे संकट आले आहे. हरणांच्या कळपावर मगरींनी हल्ला केलाय. हरणांनी पाण्यात उडी घेतल्यानंतर मगरींनी अचानकपणे हल्ला केल्यामुळे काय करावे हे हरणांना सूचत नाहीये. जिवाच्या आकांतने सगळे हरिण पाण्यात पोहत आहेत.
यामध्ये हरणाचे एक पिल्लू मागे राहिले आहे. पोहता येत नसल्यामुळे ते कळपाच्या मागे पडले आहे. तर दुसरीकडे मागे राहिलेल्या याच हरणाचा फडशा पाडण्यासाठी मगर त्याच्याकडे येत आहे. त्याचा शेवट हा जवळजवळ निश्चित आहे, असे वाटतेय. मात्र, यावेळी या पिल्लाची आई मध्ये आली आहे. आपल्या पिल्लाचा जीव वाचवण्यासाठी हरिणी मागून जोरात पोहत आली असून ती मगरीच्या तोंडाजवळ गेली आहे. तसेच मगरीजवळ जाऊन ती स्वत: भक्ष्य झालीय. पण तिने आपल्या पिल्लाचा जीव वाचवला आहे.
व्हिडीओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा
हा व्हिडीओ पाहून नेटकरी भावूक झाले आहेत. नेटकरी हा व्हिडीओ वेगवेगळ्या समाजमाध्यमावर शेअर करत आहेत. हा व्हिडीओ नेमका कुठला आहे, याची माहिती मिळू शकलेली नाही. मात्र, त्याला binnudhillons या इन्स्टाग्राम अकाऊंटवर पाहता येईल.
इतर बातम्या :
Video: ‘शेअरिंग इज केअरिंग’ हे या चिमुरड्याला कळतं, आपल्याला कधी कळणार, मांजरीसोबतचा व्हिडीओ व्हायरल
Video | लग्नाच्या दिवशीच म्हणते ‘तेरे लिये दुनिया छोड दी है,’ नवरीने गायलेलं गाण व्हायरल
Varsha Gaikwad : ग्रामीण भागात 5 वी ते 12 वी, शहरी भागात आठवी ते बारावीचे वर्ग सुरु होणार : वर्षा गायकवाडhttps://t.co/xdJVD8lv0i#VarshaGaikwad | #Maharashtra | #SchoolReopen | #Corona
— TV9 Marathi (@TV9Marathi) September 24, 2021