शाळा ही अशी जागा असते. जिथे विद्यार्थ्यांना वेगवेगळे विषय शिकविले जातात. आपण समाजात कसं वावरलं पाहिजे कसं राहिलं पाहिजे हे शिकवलं जातं. शाळेतील मुलं शिक्षकांकडूनच हे सगळं शिकत असतात. त्यामुळे शिक्षक तर अर्थातच चांगले हवेच. एक व्हिडीओ व्हायरल होतोय ज्या व्हिडीओत दोन शिक्षिका एकमेकींशी जबरदस्त भांडतायत. हा व्हिडीओ उत्तर प्रदेशातील शाळेचा आहे. सरकारी शाळेचा.
सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये 2-3 महिला शिक्षिका एकमेकांना मारहाण आणि शिवीगाळ करताना दिसत आहेत.
उत्तर प्रदेशच्या हमीरपूर जिल्ह्यातील एका सरकारी मुलींच्या शाळेत गांधी जयंतीच्या दिवशी 2 ऑक्टोबर रोजी ही घटना उघडकीस आल्याचा दावा या व्हिडिओत करण्यात आलाय.
महिला शिक्षिका मारामारी करण्यात मग्न होत्या. या वादानंतर महिला शिक्षिकांमध्ये बाचाबाची झाली. दरम्यान तीन शिक्षिकांना निलंबित करण्यात आलंय.
A fight broke out between the two female teacher of Govt School in Hamirpur Uttar Pradesh. pic.twitter.com/iC69WoZzhv
— Ahmed Khabeer احمد خبیر (@AhmedKhabeer_) October 3, 2022
मीडिया रिपोर्ट्सनुसार, बेसिक एज्युकेशन ऑफिसरने (बीएसए) व्हायरल व्हिडिओची दखल घेत या संघर्षात सहभागी असलेल्या तीन शिक्षकांना निलंबित केले आहे.