सोशल मीडियावर दररोज आश्चर्यचकित आणि मजेशीर फोटो व्हायरल होत असतात. पण या सगळ्या फोटोंमध्ये सर्वात जास्त व्हायरल झाले आहेत ते म्हणजे अवघड फोटोज. या फोटोंना ऑप्टिकल इल्यूजन म्हणतात. हे व्हायरल होण्यामागील एक कारण म्हणजे लोक त्यावर बराच विचार करतात, खूप डोकं लावतात. ज्यामुळे निरीक्षण कौशल्य चांगले होते आणि मेंदूलाही चालना मिळते.
लोकांना गोंधळात टाकणारा हा फोटो सोशल मीडियाच्या वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या चित्रात अनेक बाण आहेत, ज्यात एक प्राणी लपलेला आहे. बहुतेक लोकांना फक्त यात फक्त बाणच दिसतात.
हा फोटो खूप गोंधळात टाकतो. ऑप्टिकल इल्यूजनचे फोटो पाहिले की लोक गोंधळात पडतात. डोळ्यांना फसवणाऱ्या या चित्रांमधील छुप्या गोष्टी आपल्या डोळ्यासमोर असतात, पण आपल्याला दिसत नाहीत. आम्ही तुम्हाला एक छोटाशी हिंट देतो. या चित्रात जो प्राणी दडलेला आहे तो जिराफ आहे.
जर तुम्हाला अजून चित्रात जिराफ सापडत नसेल तर या चित्राच्या मधोमध जिराफ दडलेला आहे. चित्राच्या मधोमध डोळे ठेवले तर हा प्राणी आपल्याला दिसतो.