सोशल मीडियावर दररोज ऑप्टिकल इल्यूजनचा फोटो व्हायरल होत असतो. कधी एखादी वस्तू शोधावी लागते, तर कधी प्राणी. बहुतेक ऑप्टिकल भ्रम प्राण्यांच्या शोधाबद्दल असतात. लोकांना प्राणी शोधण्याचे भ्रम आवडतात, कारण ते थोडे टिपिकल आणि मनोरंजक असतात. गेल्या अनेक दिवसांपासून प्राण्यांसोबतच्या ऑप्टिकल इल्यूजन्सना खूप पसंत केलं जात आहे. असाच एक फोटो सोशल मीडियावर समोर आला आहे. या चित्रात आपल्याला झाडांमध्ये लपलेला एक लांडगा शोधावा लागेल.
अमेरिकन वाइल्डलाइफ फोटोग्राफर आर्ट वोल्फे यांनी काढलेल्या फोटोंपैकी हा एक फोटो आहे. या चित्रात तुम्हाला एका जंगलाचे दृश्य दिसते, जिथे अनेक झाडे आणि पडलेले गवत दिसते.
आता या चित्रात ११ सेकंदाच्या आत जंगलात उपस्थित असलेल्या लांडग्याचा शोध तुम्हाला घ्यायचा आहे. या प्रकारचे ऑप्टिकल भ्रम आव्हान आपले निरीक्षण कौशल्य वाढविण्यात मदत करते.
या ऑप्टिकल इल्यूजन टेस्टमध्ये तुम्हाला 11 सेकंदाच्या आत जंगलात लपलेला लांडगा शोधावा लागेल. फोटो इतका किचकट आहे की लगेच लांडगा दिसणं जरा अवघड आहे पण लक्ष देऊन पाहिलं तर नक्कीच शक्य आहे.
या चित्रातील लांडगा ओळखण्याचा उत्तम मार्ग म्हणजे चित्र काळजीपूर्वक पाहणे. आपल्या निरीक्षण कौशल्यांची चाचणी घेण्याचा हा एक चांगला मार्ग आहे.
तुम्हाला लांडगा दिसला का? नाही तर मग आम्ही तुम्हाला एक हिंट देतो. लांडगा एका झाडाच्या पाठीमागून डोकावत आहे. तुमच्यापैकी किती जणांना आतापर्यंत लांडगा सापडला आहे?
ज्यांनी दिलेल्या वेळेत लांडग्याचा शोध लावला त्यांचे निरीक्षण कौशल्य चांगले आहे. योग्य उत्तर जाणून घेण्यासाठी खाली दिलेल्या चित्राकडे बारकाईने पाहा.