गेल्या काही महिन्यात अनेक धक्कादायक ऑप्टिकल इल्युजन व्हायरल झाले आहेत, ते पाहून नेटिझन्सना खूप डोकं चालवावं लागतंय. चित्रांचे कोडे असो वा चित्रकलेच्या आत दडलेले काही, ऑप्टिकल भ्रम सोडवण्यात नेहमीच मजा येते. सोशल मीडियावर बर्फाळ भागाचा एक फोटो व्हायरल होत आहे, ज्यामध्ये लोकांना ध्रुवीय अस्वल म्हणजेच माउंटन बिअर शोधावे लागत आहे. हे आपल्याला दिसतं तितकं सोपं कोडं नाही. हे आव्हान सोडवण्यासाठी तुमच्याकडे फक्त 10 सेकंद आहेत.
असे मानले जाते की हा ऑप्टिकल भ्रम सर्वात कठीण आहे, जो सोडविण्यासाठी बऱ्याच लोकांना खूप वेळ विचार करावा लागलाय.
बऱ्याच लोकांना बर्फाळ टेकडीशिवाय दुसरे काहीही दिसले नाही. ऑप्टिकल इल्यूजनच्या पिक्चरमध्ये जमीन आणि दाट बर्फाच्छादित झाडं असलेला गोठलेला तलाव दिसतो. या चित्रात कुठेतरी ध्रुवीय अस्वल म्हणजेच पांढरं अस्वल बर्फात लपलेले असते पण ते ओळखणे सोपे नाही.
हा ऑप्टिकल भ्रम 10 सेकंदात सोडवण्याचं आव्हान तुम्ही घेऊ शकता का? ऑप्टिकल भ्रमाचे चित्र काळजीपूर्वक पहा. ज्यांनी हे चित्र पाहिले त्या सर्वांना आश्चर्य वाटेल कारण त्यांच्यापैकी बहुतेकांना दिलेल्या मुदतीत मोठे ध्रुवीय अस्वल सापडलं नसणार.
तुम्हाला एक हिंट देतो. हिंट तुम्हाला ते सहज शोधण्यात मदत करेल. या चित्रात मोठ्या खडकाच्या अगदी मागे नीट बघा.
आपण अस्वलाचे डोके आणि शरीर मागच्या बाजूस चिकटलेले पाहू शकता. तरीही ते सापडत नसेल तर खाली दिलेले चित्र पाहावे.