अनेकदा आपण फसतो आणि ऑप्टिकल इल्युजन जर असेल तर अजूनच गोंधळायला होतं. यावेळी आम्ही एक अतिशय वेगळं चित्र घेऊन आलो आहोत, ज्यात तुम्हाला मूर्तींमध्ये एक खरी व्यक्ती शोधावी लागेल. खरं तर ऑप्टिकल इल्युजन हा एक असा खेळ आहे जो प्रत्येकाला खेळायचा असतो, परंतु तो खेळण्यासाठी मेंदूची आवश्यकता असते. हा फोटो समोर आला आहे, नीट बघा. या सगळ्या पुतळ्यांमध्ये एक खरी व्यक्ती आहे.
एका युजरने लोकांना आव्हान दिलं की, जर सर्व प्रतिभावंतांचा स्वतःवर विश्वास असेल तर या प्रश्नाला उत्तर द्या. या चित्रात पुतळे दिसत असून त्यात एक व्यक्तीही दिसत आहेत. ही व्यक्ती पूर्णपणे पुतळ्यांच्या रंगात रंगलेली दिसते. अवघ्या पाच सेकंदात योग्य उत्तर द्यायचे आहे.
या चित्रात काही लोक उभे आहेत तर काही बसलेले आहेत. या पुतळ्यांच्यामध्ये उभ्या असलेल्या खऱ्या माणसाभोवती अनेक शिल्पे उभी करण्यात आली आहेत. गंमत म्हणजे तो दिसत नाही अशा प्रकारे तो या चित्रामध्ये लपविण्यात आला आहे.
हे चित्र अगदी सोपे आहे. तरीही आम्ही तुम्हाला याचे उत्तर सांगत आहोत. नीट पाहिलं तर चित्राच्या अगदी मागे एक व्यक्ती हातात घड्याळ बांधून उभी आहे आणि ती त्याकडे बघत आहे. या चित्रात तीच खरी व्यक्ती आहे आणि इतर सर्व मूर्ती आहेत. हे चित्र दिसत नाही अशा पद्धतीने सेट करण्यात आले आहे. आता तुम्ही किती वेळात योग्य उत्तर पकडलं आहे याचा अंदाज घ्या.