लग्नाचे व्हायरल व्हिडिओ आणि फोटो खूप व्हायरल होत असतात. कधी वर तर कधी वधू आपल्या कृतीमुळे चर्चेत येतात. पण कल्पना करा की लग्नाचा मंडप सजला आहे आणि सर्व पाहुणे आले आहेत आणि अशावेळी वधूच पोहोचू शकली नाही तर? हे कदाचित हे खूप चकीत करणारे प्रकरण असेल. असाच एक प्रकार समोर आला आहे, जिथे वधू स्वत:च्या लग्नापर्यंत पोहोचू शकली नाही.
खरं तर ही घटना अमेरिकेतील एका शहरातील आहे. डेली मेलने दिलेल्या वृत्तानुसार, केटी डमको असं या महिलेचं नाव आहे. तिचं लग्न होणार होतं आणि तिला एका शहरातून दुसऱ्या शहरात जावं लागलं होतं. लग्नाची सर्व तयारीही जोरात सुरू होती, वधू पक्षातील सर्व लोक तिथे पोहोचले होते, वधूचे मित्र मैत्रिणीही तिथे पोहोचले होते.
वधू ज्या विमानाने लग्नस्थळी पोहोचणार होती, ती फ्लाइट अचानक रद्द करण्यात आली. लग्नाच्या मुहूर्तावर वधू कार्यक्रमस्थळी पोहोचू शकली नाही. दुसरीकडे पाहुणे आणि नवरदेवाच्या बाजूचे लोक संतापले, इकडे वधू विमानतळावर उभी होती. मात्र या लग्नात आणखी एक ट्विस्ट समोर आला आहे.
वधू-वरांनी एकत्र लग्नस्थळासाठी रिसॉर्ट बुक केले होते. पण लग्नाचा दिवस रद्द झाल्यानंतर त्याने परताव्याची रक्कम देण्यास नकार दिला. त्यामुळे दाम्पत्याला 58 लाख रुपयांचे नुकसान सोसावे लागले. यासोबतच कॅटरिंग, फोटोग्राफी, फ्लॉवर डेकोरेशन मध्येही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
वधू ज्या विमानाने येणार होती, ती साऊथवेस्ट एअरलाइन्स कंपनीची फ्लाइट होती. साऊथवेस्ट एअरलाइन्सने गेल्या आठवड्यातील गैरसोयींबद्दल माफी मागितली आहे. आम्ही आमच्या ग्राहकांना पाठिंबा देत राहू. ग्राहकांना काही अडचण असल्यास ते आमच्या वेबसाइटवर येऊन आमच्याशी संपर्क साधू शकतात. ही महिला जिचं लग्न राहिलं ती आत दुसरी तारीख बघून काही काळानंतर लग्न करणार आहे.