गुरुवारी झालेल्या मुसळधार पावसानंतर आंध्र प्रदेशातील किनारी भागात पुराने कहर केला आहे. मुसळधार पावसामुळे तिरुपती मंदिरात रस्त्यांवर पाणी साचल्याने शेकडो यात्रेकरू अडकून पडलेले दिसले. तिरुपती शहरातील काही भागात रस्ते आणि लोकांची घरेही जलमय झाली आहेत.भारतीय हवामान विभाग (IMD) नुसार, कमी दाबाचे क्षेत्र चेन्नई आणि पुद्दुचेरी दरम्यानच्या किनारपट्टीला ओलांडले आहे. ( Flooded Conditions on Tirupati balaji temple heavy rain flash flood users share video on social media)
राज्यातील मुसळधार पावसामुळे तिरुपती मंदिरात शेकडो यात्रेकरू अडकून पडलेले दिसले. मात्र, त्याची सुटका करून तिथून बाहेर काढण्यात आले. मुसळधार पावसामुळे गुरुवारी सायंकाळपासून तिरुमला येथील भगवान व्यंकटेश्वराच्या प्राचीन मंदिराकडे जाणारा मुख्य रस्ता अनिश्चित काळासाठी बंद करण्यात आला होता. अनेक भागात पाणी साचले आहे. पाण्याच्या जोरदार प्रवाहात अनेक गाड्याही वाहून गेल्याची स्थिती आहे. तिथले दृश्य पाहून सगळेच आश्चर्यचकित होतात. प्रशासनाने अलर्ट जारी केला आहे. येथे, #तिरुपतीपाऊस आणि #tirupatifloods सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटरवर ट्रेंड करत आहेत.
व्हिडिओ पाहा:
A Connecting Bridge at Chiguruwada village to RC Puram Mandal, Rayala Cheruvu, Pachikapalam Villages breached out due to #TirupatiRains #tirupatifloods @APWeatherman96 pic.twitter.com/xGAEGhcKr3
— Hari Prasad Mitta (@hariMSprasad) November 19, 2021
A collection of Videos on #tirupatifloods & #Tirumala floods. #Tirupati & surrounding recorded extreme rains yesterday under the influence of the Depression. Some of #Weather model outputs indicated this situation in their 17th Nov. outputs. Video courtesy #COMK WA group. #NEM21 pic.twitter.com/TYfdcU7QMY
— Chennai Rains (COMK) (@ChennaiRains) November 19, 2021
#TirupatiRains #tirupatifloods #tirumalatirupati fulll on rain fall B care full guys move to safe places ??????this is main road of TIRUPATI JUNCTION FULL ON FLOW ???️?️???️ pic.twitter.com/YWxEhTRin1
— sreeramaneni poojith ??✊ (@PoojithNani99) November 18, 2021
काही युजर्स सुरक्षिततेसाठी प्रार्थना करत आहेत. तर काहींचे म्हणणे आहे की परिस्थिती खूपच भयावह दिसत आहे. एका यूजरने लिहिले की, “आंध्र प्रदेशातील हा विध्वंस पाहून हृदय थरथरते. आपत्तीग्रस्तांना मदत करण्यासाठी सरकारने शक्य तेवढे प्रयत्न करावेत. दुसरीकडे, दुसर्या युजरने लिहिले की, ‘तिरुपतीहून हृदयद्रावक माहिती येत आहे, जिथं अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात जीवित आणि मालमत्तेची हानी झाली आहे, संबंधित कुटुंबांप्रती माझा मनापासून संवेदना आहे, तसेच संरक्षणासाठी देवाला प्रार्थना करतो.
हेही पाहा: