Flying Car: पहिल्यांदाच आकाशात दिसली “फ्लाईंग कार”, आता पब्लिक टॅक्सी म्हणून वापरतील, “फ्लाईंग कार”

| Updated on: Oct 12, 2022 | 11:52 AM

चाकाच्या गाडीत बसायला घाबरणारा माणूस आता स्वतःच त्या चाकाच्या गाड्या उडवतो. आता अजून एक चमत्कार आलाय, आता आलीये उडणारी गाडी! होय.

Flying Car: पहिल्यांदाच आकाशात दिसली फ्लाईंग कार, आता पब्लिक टॅक्सी म्हणून वापरतील, फ्लाईंग कार
Flying Taxi
Image Credit source: Social Media
Follow us on

आपण एखाद्या ठिकाणी पोहचायला टॅक्सी, कार, बाईकने जातो. आता तसं आपल्याला हे सगळं नवीन नाही. असं म्हणतात की जेव्हा चाकाचा शोध लागला होता तेव्हा माणूस प्रचंड घाबरला होता. जेव्हा इंग्रज आले आणि भारतात ट्रेन घेऊन आले तेव्हाही लोक तितकेच घाबरले होते. गाडीत बसायलाच लोकांचा नकार असायचा इतके लोक घाबरायचे. हळू हळू माणसाने इतकी प्रगती केली की त्या चाकांचं कायच्या काय करून टाकलं. आता इतक्या भन्नाट गाड्या पाहायला मिळतात. चाकाच्या गाडीत बसायला घाबरणारा माणूस आता स्वतःच त्या चाकाच्या गाड्या उडवतो. आता अजून एक चमत्कार आलाय, आता आलीये उडणारी गाडी! होय. दुबईमध्ये चायनीज “फ्लाईंग कार” ने पहिल्यांदाच भरारी घेतलीये. आहेना इंटरेस्टिंग आणि भीतीदायक पण? तुम्हाला काय वाटतं माणूस घाबरेल ह्यात पण बसायला?

चिनी इलेक्ट्रॉनिक वाहन निर्माता कंपनीने तयार केलेल्या “फ्लाईंग कार” ने आकाशात पहिल्यांदाच भरारी घेतलीये.

चिनी इलेक्ट्रॉनिक वाहन निर्माता कंपनी एक्सपेंग इंक (Chinese electronic vehicle maker Xpeng Inc) असं या कंपनीचं नाव आहे.

या कंपनीने तयार केलेल्या”फ्लाईंग कार” ने संयुक्त अरब अमीरात (United Arab Emirates) आपले पहिले सार्वजनिक उड्डाण केले, ही कंपनी आंतरराष्ट्रीय बाजारात इलेक्ट्रिक विमाने लॉन्च करण्याच्या दिशेने काम करते.

X2 हे दोन सीट्स चे इलेक्ट्रिक व्हर्टिकल टेक-ऑफ आणि लँडिंग (EVTOL) विमान आहे जे वाहनाच्या प्रत्येक कोपऱ्यात दोन 8 प्रोपेलरने उचलले जाते.

या “फ्लाईंग कार” उड्डाण चाचणी सोमवारी दुबईत झाली. ही चाचणी मानवरहित होती. 90 मिनिटांच्या या चाचणीच्या उड्डाणाचं वर्णन करताना या कारच्या निर्मात्याने, “पुढच्या पिढीच्या उडत्या कारसाठी एक महत्त्वाचा आधार” असं केलंय.

एक्सपेंग एरोहाटचे जनरल मॅनेजर मिंगुआन किउ यांनी सांगितले की, “आम्ही आंतरराष्ट्रीय बाजारात टप्प्याटप्प्याने पावले टाकत आहोत. “प्रथम आम्ही दुबई शहराची निवड केली कारण दुबई हे जगातील सर्वात नाविन्यपूर्ण शहर आहे.”