फ्री iPhone मिळवण्यासाठी मुलीने दिलं केसांचं बलिदान, टक्कल करताना खूप रडली VIDEO VIRAL

| Updated on: Oct 23, 2023 | 12:52 PM

iPhone ची क्रेझ माणसाला कायच्या काय करायला लावू शकते. जसा प्रेमात माणूस काहीही करू शकतो तसा iPhone च्या प्रेमातही माणूस काहीही करू शकतो. आता हाच व्हिडीओ बघा, काय वाटतं तुम्हाला iPhone घेण्यासाठी कोण कुठल्या प्रकारचं बलिदान देऊ शकतं? जिथे तुमचे विचार संपतील त्याच्या पुढे जाऊन या मुलीने बलिदान दिलंय.

फ्री iPhone मिळवण्यासाठी मुलीने दिलं केसांचं बलिदान, टक्कल करताना खूप रडली VIDEO VIRAL
iPhone 15 new series
Image Credit source: Social Media
Follow us on

मुंबई: iPhone कुणाला आवडत नाही? लोक iPhone साठी काहीही करू शकतात. iPhone ची नवी सिरीज आली की लोकं वेडे होतात, लोकांमध्ये याचं फार वेड आहे. iPhone घेण्यासाठी जितका जमेल तितका लोक जुगाड लावतात. आत्ता सुद्धा iPhone 15 आल्यावर लोकांनी त्याला अक्षरशः डोक्यावर घेतलंय. iPhone ची क्रेझ विशेषतः तरुणांमध्ये जास्त दिसून येते. जो येईल त्याला iPhone घ्यायचा आहे. पण यासाठी पैसे काय कमी लागतात का? हा फोन घेण्यासाठी इतके पैसे लागतात की फोन घ्यायला पैसे कसे जमवायचे याचेही वेगळे मिम्स व्हायरल होत राहतात. iPhone ची क्रेझ माणसाला कायच्या काय करायला लावू शकते. जसा प्रेमात माणूस काहीही करू शकतो तसा iPhone च्या प्रेमातही माणूस काहीही करू शकतो. आता हाच व्हिडीओ बघा, काय वाटतं तुम्हाला iPhone घेण्यासाठी कोण कुठल्या प्रकारचं बलिदान देऊ शकतं? जिथे तुमचे विचार संपतील त्याच्या पुढे जाऊन या मुलीने बलिदान दिलंय.

जो कुणी टक्कल करेल

एका मॉल मध्ये एक अनोखा गेम सुरु होता. या गेम मध्ये जो जिंकेल त्याला iPhone 15 देण्यात येणार असं सांगण्यात आलं. खूप मुलं-मुली जमले. शाळा कॉलेज मधील ही मुलं गेम मध्ये सहभागी व्हायचं की नाही हा विचार करत होते. बरं जर सहभाग घेतला आणि तसं करून सुद्धा जर iPhone 15 मिळाला नाही तर? पण असा गेम होता काय? गेम होता टक्कल करण्याचा. जो कुणी टक्कल करेल, केसांचं बलिदान देईल, मग तो मुलगा असो किंवा मुलगी त्याला किंवा तिला iPhone 15 देण्यात येईल…

केस कापताना खूप रडतीये

इथे आजूबाजूला खूप गर्दी होती. iPhone 15 मिळणार ऐकून सगळ्यांना धक्काच बसला. पण कुणीच समोर यायला तयार नाही. तितक्यात एक सुंदर मुलगी पुढे आली. व्हिडीओमध्ये तुम्ही बघू शकता की ही मुलगी गेम मध्ये उतरली खरी पण ती केस कापताना खूप रडतीये. या मुलीला iPhone 15 खूपच आवडत असावा म्हणून तिने इतकी रिस्क घेतलीये. ही मुलगी iPhone 15 साठी चक्क आपल्या केसांचं बलिदान देतेय, टक्कल करतेय. केस कापत असताना, केस कापून झाल्यावर ती प्रचंड रडते पण शेवटी तिला iPhone 15 मिळतोच. या अनोख्या गेममुळे तिला फ्री iPhone 15 मिळतो आणि ती खूप खुश होते.