मुंबई : सोशल मीडियावर रोजच अनेक व्हिडीओ व्हायरल होतात. यातील काही व्हिडीओ चांगलेच मजेदार असतात. लग्न समारंभातील व्हिडीओ तर मोठ्या चवीने पाहिले जातात. सध्या व्हायरल होणारा व्हिडीओसुद्धा एका लग्न समारंभातीलच आहे. या व्हिडीओमध्ये नवरीला एक असे गिफ्ट देण्यात आले आहे, ज्याला पाहून ती चांगलीच लाजली आहे. (friend of bride gives strange and unique gift to her video went viral on social media)
लोकांना लग्न समारंभातील व्हिडीओ चांगलेच आवडतात. नवरी-नवरदेवांसोबत केलेली मस्करी तसेच त्यांच्याशी केलेला खट्याळपणा या व्हिडीओंमध्ये दाखवलेला असतो. याच कारणामुळे हे व्हिडीओ लोकांना अवडतात. सध्या व्हायरल होत असलेला व्हिडीओसुद्धा असाच खट्याळ आहे. हा व्हिडीओ पाहून नेटकरी चांगलेच हासत आहेत. तर मित्राने दिलेलं गिफ्ट पाहून नवरी तसेच नवरदेव चांगलेच लाजले आहेत.
हा व्हिडीओ एका लग्नसमारंभातील असून नवरी-नवरदेव लग्न मंडपात खुर्च्यांवर बसल्याचे दिसत आहे. लोक नवरी तसेच नवरदेवाकडे येऊन त्यांना लग्नाच्या शुभेच्छा देत वेगवेगळ्या भेटवस्तू देत आहेत. या व्हिडीओमध्ये नवरी तसेच नवरदेवाला असाच त्यांचा एक मित्र त्यांना बंद पाकिटामध्ये एक भेटवस्तू देताना दिसतोय. तसेच या मित्राने दिलेले गिफ्ट नवरीला उघडायला सांगितले आहे. त्यानंतर नवरी हे गिफ्ट उघडत असताना आपल्याला दिसतेय. मात्र, जेव्हा नवरी हे गिफ्ट पाहते तेव्हा ती चांगलीच लाजतेय. तसेच ती गिफ्ट बाजूला करते आहे. मिळालेले गिफ्ट पाहून नवरदेवसुद्धा चांगलाच हासत असल्याचे आपल्याला दिसत आहे.
पाहा व्हिडीओ :
दरम्यान, हा व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांनी विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत. तसेच हा व्हिडीओ आवडला असल्याचे म्हणत त्याला मोठ्या प्रमाणात लाईकसुद्धा केले आहे. सोशल मीडियावर हा व्हिडीओ सध्या चर्चेचा विषय ठरलाय.
इतर बातम्या :
Video | वर्कआउट करताना हेमांगी कवीचा ठुमकत ठुमकत डान्स, सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
Video | चिमुकल्याच्या डान्सने उडवली धम्माल, व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल
(friend of bride gives strange and unique gift to her video went viral on social media)