अनेकदा चोरीचे व्हिडीओ देखील तुफान व्हायरल होतात. हे व्हिडीओ इतके हसवतात की त्याला काही तोड नसते. चोर अशा पद्धतीने चोरी करायला जातात की, “अरे असा कसा रे तु चोर बनणार?” असं म्हणायची इच्छा होते. हे व्हिडीओ लोकांना आश्चर्यचकित करतात आणि विचार करायला भाग पाडतात. तसं पाहिलं तर लोकांना सहसा मजेशीर व्हिडिओ बघायला आवडतात, ज्यामुळे चेहऱ्यावर एक वेगळंच हसू येतं. सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. हा व्हिडिओ असा आहे की तुम्हीही खूप हसाल.
सहसा असे होते की नमाज पठण करणारे लोक काहीही झाले तरी मध्यंतरी नमाज पठण करणे कधीच थांबवत नाहीत. पूर्ण नमाज पठण केल्यानंतरच ते उठतात. अशा वेळी जरा विचार करा की जर एखादी व्यक्ती नमाज पठण करत असेल आणि कोणी त्याचे सामान चोरण्याचा प्रयत्न करत असेल तर तो काय करेल?
या व्हिडिओमध्ये असाच काहीसा प्रकार एका व्यक्तीसोबत घडला आहे. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, हा माणूस रस्त्याच्या कडेला असलेल्या बागेत कशी प्रार्थना करत आहे, जेव्हा एक चोर तिथे पोहोचतो आणि त्याचा मोबाइल उचलून पळून जाण्याचा प्रयत्न करतो, परंतु नमाज पठण करणारी व्यक्ती आपली बंदूक काढताच चोर शांतपणे मोबाइल जिथून उचलला गेला तिथे ठेवतो आणि ताबडतोब तिथून पळून जातो.
मस्त कटा बेचारे चोर का !!!!
??????? pic.twitter.com/OnAkAq9T2p— Hasna Zaroori Hai ?? (@HasnaZarooriHai) March 13, 2023
सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटरवर @HasnaZarooriHai नावाच्या आयडीसह हा मजेशीर व्हिडिओ शेअर करण्यात आला असून कॅप्शनमध्ये लिहिले आहे, ‘मस्त कटा बेचारे चोर का’. 34 सेकंदाचा हा व्हिडिओ आतापर्यंत 17 हजारांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे, तर शेकडो लोकांनी हा व्हिडिओ लाइक देखील केला आहे. त्याचबरोबर हा व्हिडिओ पाहिल्यानंतर लोकांनी वेगवेगळ्या प्रतिक्रियाही दिल्या आहेत.