जंगलात अनेक प्रकारचे प्राणी राहत असले तरी जंगलाच्या राजापेक्षा म्हणजेच सिंहापेक्षा घातक प्राणी दुसरा कोणताच नाही. सिंह असा प्राणी आहे जो वन्य प्राण्यांमध्ये दहशत निर्माण करतो. ज्याला बघून आपला जीव वाचवण्यासाठी इतर प्राणी धावू लागतात. सिंह प्राण्यांची शिकार करताना क्वचितच दिसतात, कारण सिंहीण शिकारीचे काम करतात. आजकाल एक मजेशीर व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, जो तुम्हाला नक्कीच हसवेल.
खरंतर या व्हिडीओमध्ये सिंहीणीसमोर एक मांजर उभी राहते, पण सिंहाला पाहताच तिची हवा निघून जाते आणि ती घाबरून पळून जाण्याच्या प्रयत्न ठरते.
व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, टीव्हीवर ‘द लायन किंग’ हा सिनेमा सुरू आहे, ज्यात सुरुवातीला सिंहिणी दिसत आहेत.
मांजर एकदम नीट लक्ष देऊन टीव्हीकडे पाहतीये. काही सेकंदात दृश्य बदलते आणि अचानक सिंह समोर येतो. मग काय, सिंहाला अचानक पाहून मांजरीची सिट्टी-पिट्टी गुल! ती पटकन मागे सरकते.
मांजरीचा हा मजेशीर व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इंस्टाग्रामवर beautiful_new_pix नावाच्या आयडीसह शेअर करण्यात आला आहे.
आतापर्यंत 1 लाख 10 हजाराहून अधिक वेळा हा व्हिडीओ पाहिला गेलाय. 6 हजाराहून अधिक लोकांनी हा व्हिडिओ देखील लाईक केलाय. त्याचबरोबर लोकांनी व्हिडिओ पाहून विविध प्रतिक्रियाही दिल्या आहेत.
सोशल मीडियावर तुम्ही प्राण्यांशी संबंधित विविध व्हिडिओ पाहिले असतील, पण अशा प्रकारे सिंहाला पाहून घाबरून पळणारी मांजर तुम्ही क्वचितच पाहिली असेल.