VIDEO : लग्नाच्या विधीत भटजींची विनोदी फटकेबाजी, नवरा-नवरीसह सगळेच खळखळून हसले!

| Updated on: Dec 24, 2021 | 3:16 PM

सध्या लग्नाचे सिझन जोरदार सुरू आहे. त्यासंबंधीचे मजेदार व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. यातील काही व्हिडीओ पाहून तुम्हाला हसू येते, तर काही पाहून आश्चर्याचा धक्का बसतो. सध्या लग्नामधील असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

VIDEO : लग्नाच्या विधीत भटजींची विनोदी फटकेबाजी, नवरा-नवरीसह सगळेच खळखळून हसले!
नवरदेव-नवरीला आले हसू
Follow us on

मुंबई : सध्या लग्नाचे (Wedding)  सिझन जोरदार सुरू आहे. त्यासंबंधीचे मजेदार व्हिडिओ (Video) सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. यातील काही व्हिडीओ पाहून तुम्हाला हसू येते, तर काही पाहून आश्चर्याचा धक्का बसतो. सध्या लग्नामधील असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

लग्नामध्ये भटजींची फुल फटकेबाजी

विशेष म्हणजे हा व्हिडीओ बघितल्यानंतर तुम्हीही पोट धरून हसाल. व्हिडिओमध्ये भटजी लग्नादरम्यान नवरा-नवरीला असे काही बोलतात. ज्यामुळे उपस्थित सर्व लोक हसायला लागतात. यावेळी नवरी आणि नवरदेव यांचे भाव देखील पाहण्यासारखे आहेत. भटजीचे बोलणे ऐकून नवरी आणि नवरदेव देखील स्वत: ला हसण्यापासून रोखू शकले नाही.

लग्नापूर्वी अनेक विधी केले जातात. हे आपल्या सर्वांना माहीत आहे. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, लग्नाच्या विधीदरम्यान नवरी आणि नवरदेव हातात वाटी घेऊन काहीतरी पाहत आहेत. या दरम्यान नवरी वाटीमध्ये अतिशय लक्ष देऊन पाहते. तेव्हा भटजी म्हणतात की, काहीही उपयोग नाही हा आरसा नाहीये फक्त सावली दिसेल मेकअप दिसणार नाही. भटजीचे हे बोलणे ऐकून सर्वजण हसू लागतात.

नवरा-नवरीसह सगळेच हसले

या अतिशय क्यूट व्हिडिओ इंस्टाग्रामवर witty_wedding नावाच्या अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. युजरने कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘तुमच्या लग्न समारंभातही भटजींनी अशी मजेशीर गोष्ट बोलली होती का ज्यामुळे तुम्हाला हसू आले?’ इन्स्टाग्रामवर अपलोड केलेल्या या व्हिडिओला 31 हजारांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत.

संबंधित बातम्या : 

हात असलेला मासा पाहिलात का?, ऑस्ट्रेलियामध्ये तब्बल 22 वर्षांनंतर आढळला दुर्मिळ हॅन्डफिश

VIDEO : वरमाला घालताना नवरदेवाने दिली वेगळीच पोज! व्हिडिओवर हजारो तरुणी फिदा…