औषध समजून Apple चा airpod गिळला, X-Ray मध्ये तर स्पष्ट दिसलं! या airpod ने पोटात जाऊन पण सगळं रेकॉर्ड केलं

| Updated on: Nov 16, 2022 | 4:55 PM

एअरपॉडने पोटाची सर्व हालचाल नोंदवली. रेकॉर्डिंगमध्ये पोटाचा गोळा आल्याचा आवाज आला.

औषध समजून Apple चा airpod गिळला, X-Ray मध्ये तर स्पष्ट दिसलं! या airpod ने  पोटात जाऊन पण सगळं रेकॉर्ड केलं
X ray of apple airpod
Image Credit source: Social Media
Follow us on

कधी कधी आपण छोट्या छोट्या गोष्टींकडे दुर्लक्ष करतो आणि मग नंतर त्रास सहन करावा लागतो. जेव्हा आपण काही चुकीचं वागतो, तेव्हा आपल्याला नंतर कळतं की काहीतरी गडबड झाली आहे. असंच काहीसं एका महिलेसोबत झालं, हे औषध आहे असं समजून तिनं आपल्या ॲपल एअरपॉडचा गिळला. मात्र, तोपर्यंत खूप उशीर झाल्याचे त्याच्या लक्षात आले. ॲपल एअरपॉड्ससोबत आपला अनुभव शेअर करणाऱ्या बोस्टनच्या एका महिलेचा टिकटॉक व्हिडिओ व्हायरल होत आहे.

टिकटॉकवर @iamcarliiiib वापरकर्ता नाव असलेल्या या महिलेने चुकून औषधा ऐवजी तिचा एक एअरपॉड गिळला. मात्र, हे वर्षभर जुने प्रकरण आहे. त्यानंतर जे झालं ते धक्कादायक आहे.

या महिलेने सांगितले की, तिला तिच्या हातात असलेली इब्रूप्रोफेन ही पेनकिलर घ्यायची होती. एका बाजूला गोळी होती आणि दुसऱ्या बाजूला एअरपॉड.

ती एकदम गोंधळून गेली आणि तिने पटकन औषधाऐवजी एअरपॉड गिळला. गिळल्यानंतर काही सेकंदांनी तिला ही चूक लक्षात आली.

अस्वस्थ वाटू लागल्याने तिला शंका आली. मग तिने बळजबरीनं पोटात जे गेलंय ता बाहेर काढण्याचा प्रयत्न केला, पण तिला यश आलं नाही. एक्स-रे केल्यानंतर त्याच्या पोटात एअरपॉड असल्याचं तिला समजलं.

या महिलेने असेही नमूद केले की एअरपॉड तिच्या पोटातून रेकॉर्ड करण्यास सक्षम आहे, कारण तो अजूनही तिच्या आयफोनशी जोडलेला आहे.

एअरपॉडने पोटाची सर्व हालचाल नोंदवली. रेकॉर्डिंगमध्ये पोटाचा गोळा आल्याचा आवाज आला. जो तिने आपल्या मित्रासोबत शेअर केला होता. एअरपॉड गिळल्याने काही दुष्परिणाम झाले आहेत. बातमीने एकच खळबळ उडाली.