सोशल मीडियाच्या दुनियेत जर तुम्ही ॲक्टिव्ह असाल तर तुम्ही एकापेक्षा एक भन्नाट डान्स व्हिडिओ पाहिले असतील. जे आपण फक्त पाहतच नाही तर एकमेकांशी शेअरही करतो. हे व्हिडिओ पाहण्याची एक वेगळीच मजा आहे. त्यामुळे या क्लिप्स इतरांपेक्षा जास्त वेगाने व्हायरल होतात. सध्या एक व्हिडिओ समोर आला आहे. जिथे एका मुलीने पिवळ्या साडीत डान्स करून धुमाकूळ घातलाय.
तसं पाहिलं तर आजच्या काळात ज्यांना आपलं कौशल्य सगळ्यांना दाखवायचं आहे, त्यांच्यासाठी इंटरनेट वरदान ठरलं आहे. इथे असे अनेक प्लॅटफॉर्म आहेत ज्यांनी कलाकारांना अगदी खालपासून वरपर्यंत पोहचवलंय. लोक आता आपली प्रतिभा अशा अशा लोकांपर्यंत पोहोचवण्यात यशस्वी होतात जिथे त्यांना कधी प्रवेश नव्हता. पण जेव्हा पासून इंटरनेट आलं तेव्हापासून दिवसच बदलले. आजच्या युगात असे खूप कमी लोक असतील जे इंटरनेट वापरत नसतील. आता पाहा हा व्हिडिओ जिथे पिवळ्या रंगाची साडी परिधान केलेल्या एका मुलीने सुपर डान्स केलाय. तिने तिच्या परफॉर्मन्समधून अक्षरशः महफिल लुटलीये.
व्हायरल होत असलेला व्हिडिओ एका फंक्शनचा असल्याचे दिसत आहे. जिथे एक मुलगी पिवळ्या रंगाच्या साडीत डान्स करताना दिसत आहे. एकीकडे लोकांना साड्या घालण्यात अडचणी येत आहेत. त्याचबरोबर ही मुलगी असा भन्नाट डान्स करत आहे, जो तुम्ही कुठेही पाहिला नसेल. इथे मुलीचा परफॉर्मन्सच नाही तर स्पीडही कमालीचा होता. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर विश्वास ठेवा, प्रोफेशनल डान्सर्सही आश्चर्यचकित होतील.
a_s_dancer_ नावाच्या अकाऊंटने हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. ही बातमी लिहिपर्यंत या व्हिडिओला 17 लाखांहून अधिक लोकांनी लाईक केले असून त्यांच्या प्रतिक्रिया कमेंट सेक्शनमध्ये दिल्या जात आहेत. एका युजरने लिहिलं, ‘त्यांचा परफॉर्मन्स खरंच अप्रतिम आहे’.