सोशल मीडियावर प्रसिद्धी आणि लोकप्रियता मिळवण्यासाठी नेटकरी कायम नवीन प्रयत्न करताना दिसतात. गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर डान्सचे व्हिडीओ तुफान व्हायरल होतं आहे. नेटकरी कोणत्याही ठिकाणी मोबाईलचा कॅमेरा चालू करत डान्स करू लागतात. गेल्या काही दिवसांपासून मेट्रो, ट्रेन, रेल्वे स्टेशन आणि इतर सार्वजनिक ठिकाणी हास्यास्पद कृत्ये करण्याचा आणि नाचण्याचा ट्रेंड वाढताना दिसत आहे. याबाबत अधिकाऱ्यांकडून बजावण्यात देखील आलं आहे. पण असं असताना देखील काही कंटेंट क्रिएटर्स सार्वजनिक ठिकाणी डान्सचे व्हिडीओ शूट करताना दिसत आहे.
आता देखील सोशल मीडियावर एका तरुणीचा डान्स व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. व्हिडीओमध्ये अभिनेत्री भोजपुरी गाण्यावर डान्स करताना दिसत आहे. व्हिडीओ पाहिल्यानंतर अनेकांनी तरुणीवर टीका देखील केली आहे. शिवाय अनेकांनी तिला अटक करण्याची मागणी केली आहे.
Passengers can never travel in Peace inside #MumbaiLocals, Hawkers Beggars & now Reel makers
It’s high time @grpmumbai @drmmumbaicr @RailMinIndia put an END to this Nuisance
Scene inside @centralrailway trains & at CSMT stn
Offenders Insta a/c @manishadancer01 pic.twitter.com/qVxtWyZeTU
— मुंबई Matters™ (@mumbaimatterz) May 28, 2024
व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये मुलगी चालू लोकलमध्ये डान्स करताना दिसत. तरुणी अशा काही डान्स स्टेप करत आहे. ज्यापाहून काही प्रवासी बसलेल्या सीटवरून दुसरीकडे गेले. अवघ्या काही सेकंदांची ही क्लिप पाहून लोक तरुणीवर करत आहेत. काहींनी तिचा डान्स अश्लील असल्याचे म्हटलं आहे. तर सार्वजनिक वाहतुकीत असे वर्तन करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे आवाहन रेल्वे पोलिसांना केलं आहे.
पोस्टवर अधिकाऱ्यांनी प्रतिक्रिया देखील दिली आहे.मुंबई सेंट्रल डीआरएमच्या अधिकृत हँडलवरून या घटनेची चौकशी करून योग्य ती कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. सांगायचं झालं तर, व्हिडीओमध्ये दिसणाऱ्या तरुणीचं नाव मनीषा डान्सर असं आहे. काही दिवसांपूर्वी तिने दिल्ली मेट्रोमध्ये देखील डान्स केला होता.
तरुणीच्या व्हिडीओवर नेटकरी कमेंट करत संताप व्यक्त करत आहेत.’यापूर्वी देखील तरुणीला इशारा दिल्यानंतर सोडण्यात आलं. पण आता तिला अटक करून मुंबईबाहेर फेकले पाहिजे.’ तर अन्य एक नेटकरी म्हणाला, ‘ती असं करते कारण, तिला पाहण्यासाठी अनेक जण तरुणीला फॉलो करतात.’ सध्या सोशल मीडियावर तरुणीची चर्चा रंगली आहे.