समजा तुम्ही एखाद्याच्या प्रेमात पडलात, तेही ऑनलाइन तर? ऑनलाइन प्रेम ही एक वेगळीच रिस्क आहे नाही का? अशा पद्धतीनं प्रेमात पडणारे लोक खूप धाडसी असतात असं म्हणायला हरकत नाही. माणूस कुठला, कोण, खरा, खोटा काहीच कळत नाही. जर फसवणूक झाली तर? आजच्या युगात ऑनलाइन लव्ह किंवा डेटिंग ॲपवर स्वत:साठी जोडीदार शोधणं अगदी सोपं झालं आहे. पण त्याचे दुष्परिणामही खूप समोर येतात. अनेक वेळा अशी फसवणूक होते की, लोकांना हे आयुष्यभर लक्षात राहतं. या अफेअरमध्ये एक मुलगी परदेशात पोहोचली अशीच एक घटना समोर आली आहे.
ही मुलगी ऑस्ट्रेलियातील सिडनी येथील रहिवासी आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, काही महिन्यांपूर्वी ती एका डेटिंग ॲपवर एका मुलाला भेटली होती.
यानंतर दोघांमध्ये संभाषण झालं. हा मुलगा इंडोनेशियातील बाली येथील रहिवासी असल्याचे आढळून आले. संभाषणाच्या ओघात त्याने भेटण्याचा बेतही आखला.
लांबचा प्रवास केल्यानंतर ही मुलगी ऑस्ट्रेलियाहून इंडोनेशियाला जाणार हे निश्चित झाले. वेळ काढून ही मुलगी इंडोनेशियाला पोहोचली, त्यासाठी तिकीट काढलं आणि तिथे पोहोचल्यावर तिने गाडी बुक केली आणि रस्त्यावरुन लांबचा प्रवासही केला.
पण जेव्हा तिने मुलाला फोन केला तेव्हा त्या मुलाने तिला भेटण्यास नकार दिला. मुलीने अनेकदा मेसेज करूनही तो आला नाही.
असे का घडले, या विचाराने ती मुलगी ऑस्ट्रेलियाला परतली. यावर लोकांनी असे सुचवले की असे असू शकते की मुलगा फक्त मजा करण्यासाठी हे करत आहे. कदाचित त्याचे लग्न झाले असेल किंवा त्याला आधीच एखादी मैत्रीण असेल. नेमकं कारण त्या मुलीला समजू शकलं नाही पण सध्या ही मुलगी ऑस्ट्रेलियात परतली आहे.