नशीब बलवत्तर! मुसळधार पावसात कशी वाचली ते तर पहा…

| Updated on: Jun 27, 2023 | 1:22 PM

मृत्यू केव्हा, कुठून येईल हे कुणालाच ठाऊक नसते. दरवर्षी लाखो लोक रस्त्यावरील अपघातात मृत्युमुखी पडतात. त्यातील काही जण स्वत:च्या चुकीमुळे मृत्यूला बळी पडतात, तर काहींना इतरांच्या चुकीमुळे जीव गमवावा लागतो. तसं पाहिलं तर कधी कधी असे काही अपघात होतात, ज्यासाठी कुणालाही जबाबदार धरता येत नाही.

नशीब बलवत्तर! मुसळधार पावसात कशी वाचली ते तर पहा...
Scooty accidents goes viral on the internet
Follow us on

मुंबई: रस्त्यावरून चालताना अनेक गोष्टींची काळजी घ्यावी लागते. येणारी-जाणारी वाहनेच नव्हे, तर आजूबाजूच्या गोष्टींकडेही लक्ष द्यावे लागते, कारण मृत्यू केव्हा, कुठून येईल हे कुणालाच ठाऊक नसते. दरवर्षी लाखो लोक रस्त्यावरील अपघातात मृत्युमुखी पडतात. त्यातील काही जण स्वत:च्या चुकीमुळे मृत्यूला बळी पडतात, तर काहींना इतरांच्या चुकीमुळे जीव गमवावा लागतो. तसं पाहिलं तर कधी कधी असे काही अपघात होतात, ज्यासाठी कुणालाही जबाबदार धरता येत नाही. असाच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, जो पाहून तुम्हाला जबरदस्त धक्का बसेल.

अचानक वादळाने एक झाड रस्त्यावर कोसळले…

खरं तर या व्हिडिओमध्ये एक मुलगी स्कुटी चालवत चालली आहे. अवघ्या एक-दोन सेकंदाने तिचे प्राण वाचतात. नशीब बलवत्तर म्हणून वाचली नाहीतर ती थेट हॉस्पिटलमध्ये दिसली असती. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की मुसळधार पाऊस पडत आहे आणि वादळी वाऱ्याचेही वातावरण आहे. या पावसात लोकही ये-जा करत आहेत. याच रस्त्यावरून स्कूटीवरून जाणारी एक मुलगी दिसते. अचानक वादळाने एक झाड रस्त्यावर कोसळले ती मुलगी काहीच सेकंदाने झाडापासून लांब असते. झाड पडल्यावर ती अलीकडेच थांबून लगेच मारते नाहीतर या मुलीला गंभीर दुखापत झाली असती.

 ‘बच गई बेचारी’

हा धक्कादायक व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटरवर @HasnaZarooriHai नावाच्या आयडीसह शेअर करण्यात आला असून कॅप्शनमध्ये लिहिले आहे, ‘बच गई बेचारी’. अवघ्या 6 सेकंदाचा हा व्हिडिओ आतापर्यंत 48 हजारांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे, तर शेकडो लोकांनी या व्हिडिओला लाईक करत विविध कमेंट्सही केल्या आहेत.

 ‘पायाने ब्रेक लावणे कामी आले’

कोणी म्हणत आहे की ती नशीबवान आहे की ती वाचली, तर काही जण म्हणत आहेत की देवाने तिचा जीव वाचवला. त्याचप्रमाणे एका युजरने मजेशीर पद्धतीने लिहिले आहे की, ‘त्या दिवशी यमराजजींनी सुट्टी घेतली असावी असे वाटते’, तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, ‘पायाने ब्रेक लावणे कामी आले’.