Viral Video: देशात आणि जगात कधीकधी वेगळ्या घडामोडी घडत असतात. काही घडामोडींची आपण कल्पनाही करु शकत नाही. सोशल मीडियावर सध्या एक वेगळाच व्हिडिओ व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहून तुम्हाला धक्का बसणार आहे. हा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. मुलींनी काढलेल्या एका आगळा वेगळा मोर्चा त्या व्हिडिओत दिसत आहे. ‘क्लीन शेव बॉयफ्रेंड’ साठी ही रॅली मुलींनी काढलेली दिसत आहे.
सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल झाला आहे. काही मुलींनी एक मोर्चा काढला आहे. हा मोर्चा सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. सध्या मुले दाढी ठेवतात. त्या दाढी विरोधात मुलींचा एक गट आक्रमक झाला आहे. मुली क्लीन शेव बॉयफेंड म्हणत मोर्चा काढत आहेत. त्यांच्या हातात वेगवेगळे पोस्टर आहे. त्यात लिहिले आहे की ‘No Clean Shave No Love’ दुसऱ्यावर लिहिले आहे की ‘दाढ़ी हटाओ प्यार बचाओ।’ आणखी एका पोस्टरवर लिहिले आहे की, ‘दाढ़ी रखो या गर्लफ्रेंड रखो, Choice तुम्हारी।’
व्हिडिओमधील मुली या घोषणाही देत आहेत. परंतु या मोर्चासंदर्भात काहीच माहिती दिली गेली नाही. हा मोर्चा रिल तयार करण्यासाठी काढला गेला आहे का? हा मोर्चा एखाद्या प्रमोशनसाठी केला आहे का? हा मोर्चा एखाद्या इव्हेंटसाठी केला आहे का? हे यामधून स्पष्ट होत नाही. परंतु हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला आहे.
Clean shave ke liye ladkiyon ne kiya kalesh🤯 pic.twitter.com/QkmIROdDyk
— Ghar Ke Kalesh (@gharkekalesh) October 17, 2024
व्हिडिओ एक्स हँडलवर @gharkekalesh नावाच्या अकाउंटवरुन शेअर केला आहे. हा व्हिडिओ हजारो लोकांनी पाहिला आहे. हजारो जणांनी त्यावर प्रतिक्रिया दिली आहे. एका युजरने लिहिले आहे की, मुलांनी असे केले असते तर गोंधळ झाला असता. दुसरा एका व्यक्तीने लिहिले की, दाढीमध्ये यांना काय अडचण आहे. आणखी एक जण लिहितो हे रिलसाठी आहे.